Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातील दोन अपघातात चारजण ठार, पहाट ठरली काळरात्र

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : आज सोलापुरात पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे येथे आणि सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी अशा अपघाताच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या यात चारजण ठार तर दोनजण जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात पहाटे झाले आहेत. ही पहाट त्यांच्यासाठी काळरात्रच ठरली.



ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात  दोनजण ठार तर चारजण जखमी झाले. हा अपघात पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याजवळ आज रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. 


दुसऱ्या अपघातात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रकला भरधाव जाणाऱ्या कारने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी शिवारातील एका हॉटेल समोर आज पहाटे साडेसहा वाजता झाला. गुरसाळेजवळील अपघातातील मयत आणि जखमी हे नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि सिन्नर येथील आहेत. 


या अघातातील फिर्यादी किशोर संपत लोखंडे (वय 27, रा. चादोरी, ता. निफाड, जि. नाशिक) हे त्यांची पत्नी रेश्‍मा लोखंडे, मामा त्रिंबक मारुती आव्हाड, वेदांत मारुती आव्हाड, सुरज भीमराव ठोंबरे (रा. वडजेरीगाव, ता. सिन्नर) यांच्यासह एमएच 46/डब्ल्यू 8903 या क्रमांकाच्या ओमनी गाडीतून देवदर्शनासाठी पंढरपूरकडे येत होते. पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे गावाच्या हद्दीत त्यांची गाडी आली असताना पुढे रिफ्लेक्‍टर नसलेला ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह ऊस घेऊन निघाला होता. 


ओमनीचा चालक सौरभ प्रभाकर घोडके (रा. वडजेरीगाव, ता. सिन्नर) यास रिफ्लेक्‍टर नसलेली ट्रॉली न दिसल्याने भरधाव वेगात ओमनी गाडी ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीला मागून धडकून अपघात झाला. अपघातात ओमनी कारमधील संजीवनी मारुती आव्हाड (वय ३५, रा. निफाड), सूरज भीमराव ठोंबरे (वय २१) या दोघांचा मृत्यू झाला. गाडीतील किशोर संपत लोखंडे, रेश्‍मा लोखंडे, त्रिंबक मारुती आव्हाड, वेदांत मारुती आव्हाड यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


या अपघातप्रकरणी किशोर लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओमनीचा चालक सौरभ घोडके याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वडाचीवाडी अपघाताबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, इको कार (क्र. एमएच ०४ डीके १११३) मधून देवदर्शनासाठी मुंबई येथून तुळजापूरकडे दिपक दगडू उबाळे, यासह यांचा मुलगा राहुल दिपक उबाळे (दोघेही रा. चेंबूर, मुंबई), अमोल दिपक पवार (रा. मरळ, मुंबई) व सुखदेव गजानन शिंदे (रा. आंबेवाडी ठाणे) असे चार जण निघाले होते. 


दरम्यान, त्यांची इको कार मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी हद्दीत आली असता निलकमल हॉटेल समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या मालट्रक (एमएच ११ एएल ७१४९) ला पाठीमागून जाऊन जोरात धडकली. यामध्ये दीपक दगडू उबाळे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा राहुल दीपक उबाळे (वय २६) यांचा उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या अमोल दिपक पवार (वय २६) यांची प्रकृती चिंताजनक असून, चालक शिंदे हेही जखमी आहेत.



अपघाताची माहिती मिळताच सावळेश्वर टोल नाक्याच्या पेट्रोलिंग पथकाने जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सोलापूर येथे पाठवले. देवदर्शनासाठी निघालेल्या उबाळे पिता-पुत्रांच्या या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या या अपघाताची खबर सावळेश्वर टोल नाक्याच्या पथकाचे अमर डोंबे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

जितेंद्र आव्हाडांच्या त्या तिखट ट्विटची चर्चा ;……पण नेभळटांकडून ते ही झालं नाही

Next Post

वादग्रस्त गटशिक्षणाधिकारी अशोक ‘भांजे’ मुळेच झाले झेडपीत अनेकांचे ‘वांदे’ ; ‘भांजे’ला अभय का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वादग्रस्त गटशिक्षणाधिकारी अशोक 'भांजे' मुळेच झाले झेडपीत अनेकांचे 'वांदे' ; 'भांजे'ला अभय का?

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979117
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group