सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाच्या नीटनेटकी नियोजन करण्यात आले असून आज सोलापूरचे महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली उगले यांनी शहरातील 12 विसर्जन कुंड तसेच मूर्ती संकलन केंद्र येथे भेट देऊन पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप,नगर अभियंता लक्ष्मण चलवादी,सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरिता आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी तुळजापूर रोड येथील खाण, विष्णू घाट, गणपती घाट त्याचबरोबर घरकुल येथील माढा विहीर तसेच इतर विसर्जन कुंडच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली असून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, झाडांचे फांद्या कट करणे तसेच लाईटची व्यवस्था त्याचबरोबर श्री ची मूर्ती संकलनासाठी व विसर्जनासाठी गाड्यांची व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आले असून शहरातील एकूण 83 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभे करण्यात आले आहे. तसेच विसर्जनापूर्वी राहिलेले कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावर्षीचा गणेशोत्सव निर्वीघ्नपणे व सुरळीत पार पाडावा अशा प्रकारच्या प्रयत्न महापालिकेचेवतीने राहील अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर शहरातील गणेश भक्तांनी आपले गणेश मूर्ती संकलनासाठी द्यावे असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.