Saturday, August 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

नामदार बच्चू कडूंनी सोलापूरकरांना जिंकले..! दिव्यांगासाठी घरकुल व अंत्योदय योजना सुरू करण्याची घोषणा ; दिव्यांगांचा पगार मिळणार या तारखेला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 September 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर, दि. 20 (जिमाका):-जागतिक स्तरावर तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा केला जातो. राज्य शासनाने मागील वर्षी 3 डिसेंबर रोजी दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. या विभागाच्या वतीने राज्यातील दिव्यांगाना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राज्य शासनाने राबवावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली असून ती लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मार्गदर्शक ओमप्रकाश (बच्चू) कडू यांनी केले.

येथील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात श्री. बच्चू कडू मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, दिव्यांग कल्याण आयुक्त विष्णुदास घोडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी बारगुडे यांच्यासह दत्ता चौगुले, नितीन माने, आभूताई भोजने, झविर शेख आदी उपस्थित होते.


दिव्यांगासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असावे यासाठी मागील पंधरा वीस वर्षापासून लढा दिला जात होता, त्याला यश येऊन 3 डिसेंबर 2022 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून हे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेले आहे. तेव्हापासून हा विभाग दिव्यांगांच्या कल्याणासाठी कृतीशील पणे काम करत असून प्रशासनाकडून ही तेवढेच सहकार्य मिळत आहे. आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिव्यांगाची अत्यंत चांगली सोय केलेली आहे व मागील वर्षभरात प्रशासन दिव्यांगासाठी उत्कृष्टपणे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दिव्यांगाप्रती अशीच संवेदना ठेवून सकारात्मक काम करावे व सोलापूर जिल्हा दिव्यांगाच्या योजना राबवण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर असावा असे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले.


शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दिव्यांगाची सेवा ईश्वर सेवा म्हणून करावी. दिव्यांगाच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे असे आवाहन करून सोलापूर शहर व पंढरपूर शहरातील कोणताही दिव्यांग बांधव उपाशी राहत असेल तर त्याची माहिती द्यावी त्या बांधवाला घरपोच दोन वेळ जेवण लोकमंगल च्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. 


जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना शिक्षण प्रशिक्षण देऊन तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. मागील वर्षी 16 हजार 800 अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रशासनाच्या वतीने दिव्यांगाना घरपोच देण्यात आलेली आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देऊन आज या ठिकाणी दिव्यांगाशी संबंधित 28 विभागाचे शासकीय योजनांवर आधारित माहितीपर स्टॉल लावण्यात आलेले आहेत त्या स्टॉलला भेट द्यावी असे आवाहन ही त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने ही प्रत्येक गावात प्रत्येक दिव्यांग कुटुंबापर्यंत पोहोचून त्या कुटुंबातील प्रत्येक दिव्यांगला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.


प्रारंभी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश कडू यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिव्यांगासाठी असलेल्या योजनांची एकत्रित माहिती वर आधारित केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन श्री कडू व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षिका छाया उंब्रजकर आठवणीची साठवण या पुस्तिकेचेही प्रकाशन झाले. त्यानंतर श्री कडू यांच्या हस्ते अंध क्रिकेटपटू गंगा कदम हीस 50 हजाराचा धनादेश महापालिकेच्या वतीने देण्यात आला. अस्थिव्यंग क्रिकेटपटू मनोज धोत्रे, कळसुबाई शिखर पार केलेले दिव्यांग सोमनाथ घुले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अस्थिव्यंग अबूताई भगत, वेल्डर दस्तगीर शेख, चित्रकार लक्ष्मी शिंदे, गायक शिवशरण गडतुटे, समाजसेवक प्रभाकर कदम यांचा सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमास सुमारे दहा हजार दिव्यांग बांधव उपस्थित होते. श्री. कडू यांनी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीकडे जाऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व त्या तक्रारी संबंधित कार्याप्रमुखांनी तात्काळ सोडवण्याबाबत निर्देश दिले. दिव्यांगासाठी योजना राबवत असलेल्या 28 विभागांचे शासकीय योजनांचे माहितीपर स्टॉल कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. या स्टॉलवर ही दिव्यांग व्यक्तींची गर्दी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हूल्ले यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात अपेक्षेहून अधिक मोठा प्रतिसाद; नोंदणी फॉर्म संपले ! समन्वयाचा अभाव; दिव्यांग ताटकळत राहिले !

Next Post

सोलापूर शहरात महापालिकेचे हे आहेत गणेश विसर्जन कुंड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर शहरात महापालिकेचे हे आहेत गणेश विसर्जन कुंड

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995585
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group