अक्कलकोट ते गाणगापूर कडे जाणारी एसटी उड्डाण पुलाजवळ रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात तब्बल 40 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात देशमुख शेतालगत झाला. जखमी प्रवाशांना अककलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात काही गंभीर असलेल्या 25 रुग्णांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मंगला रेशमी,इरणा रेशमी, शशिकला हळमोरे, बाबुराव पाटील, निमा परदेशी, भीमा गायकवाड, महादेवी बिराजदार, आनंदी पटाक, संगीता पाटील, समीना पाटील, देविदास परदेशी, सुजाता पेडगावकर, देविदास पेडगावकर, हेमा पेडगावकर, प्रतीक पेडगावकर, शिवानंद स्वामी, स्नेहा गवंडी, संजू माशाळे, संगमेश्वर हौदे, सिद्धाराम आवटे, खंडू शेंडगे, सिद्धनाथ रुपवरे, नीलम जमादार, श्रेया घाटे, भाग्यश्री माळी, सादिक फुलारी, शिवानंद धनशेट्टी, ईरांना पुजारी, सुयश धायगुडे, गीता सुतार, यल्लप्पा सुतार, चंद्रशेखर पापट, अशोक पाटील, अलका पाटील, रोहित पाटील,श्रुती पवार अशी जखमींची नावे समोर येत आहेत.
सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला.त्यावेळी 108 क्रमांक अंबुलन्स कॉल आला ते लगेच डॉक्टर मुबिन मणियार आणि पायलट संदीप बाळशंकर हे दोघे 10 मिनिटात घटनास्थळी पोहचले. तिथे पाहिले असता 60 प्रवासी आढळले यातील काही गंभीर जखमी असल्या कारणाने त्यांना अगोदर 108 अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय मध्ये घेऊन जाण्यात आले. नंतर वागदरी, करजगी, सोलापूर, दुधनी येथील 108 अंबुलन्सला बोलाऊन घेऊन त्यात बाकीचे जखमी प्रवासीना हलवण्यात आले.
सुमारे 25 रुग्णांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कुणाचीही प्रकृती गंभीर नसून सर्वांवर चांगल्या पद्धतीने उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची दखल घेतली त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन करून जखमी प्रवासींवर तातडीने उपचार करावेत अशा सूचना दिल्या. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्वरित सिव्हिल हॉस्पिटल कडे धाव घेतली आणि सर्व जखमींची विचारपूस केली.
सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासह पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, डॉक्टर आग्रजा चिटणीस, डॉ जयकर हे ठाण मांडून आहेत. काही वेळाने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सिविलमध्ये दाखल झाले त्यांनी ही सर्व जखमींची विचारपूस केली आणि प्रशासनांना उपचार व्यवस्थित व्हावे अशा सूचना केल्या.
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी या अपघातातील गंभीर जखमीना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 50 हजार रुपये मदत देण्याचे ग्वाही दिली आहे.
तसेच हा अपघात मोठा असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा करून जखमींची विचारपूस केली आहे यामध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी यांनी समन्वय साधला आहे.






















