Thursday, July 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिक्षण सोडण्याचा ‘ती’चा निर्णय बदलला ; या संघटनेने दिली सव्वा लाखाची शिष्यवृत्ती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 May 2025
in Social
0
शिक्षण सोडण्याचा ‘ती’चा निर्णय बदलला ; या संघटनेने दिली सव्वा लाखाची शिष्यवृत्ती
0
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिक्षण सोडण्याचा ‘ती’चा निर्णय बदलला ; या संघटनेने दिली सव्वा लाखाची शिष्यवृत्ती

सोलापूर : ‘ती’च्या पित्याचे छत्र हरपलेले, आई बालवाडी शिक्षिका, आईचे तुटकुंजे वेतन, भावाचे शिक्षण सुरु, आजीचं आजारपण, पदव्युत्तर पदवीचे पहिले वर्ष बँक कर्ज घेऊन पूर्ण केलेले, दुसऱ्या वर्षीची फी भरणे तिच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे अशक्यप्राय बनलेले, त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडायचा निर्णय ‘ती’ने घेतला होता. मात्र वीरशैव व्हिजनने 75 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिल्यामुळे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार ‘ती’ने केला.

गौरी तोटद असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती सध्या एम. एस्सी. जैवतंत्रज्ञान विभागात बंगळुरू येथील रेवा युनिव्हर्सिटी येथे शिकत आहे. तिला वार्षिक दीड लाख रुपये फी आहे. पहिल्या वर्षीचे फी तिने बँकेकडून कर्ज काढून भरले. दुसऱ्या वर्षी फी भरण्यासाठी पैशाची उपलब्धता होत नव्हती. त्यामुळे तिने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिची माहिती वीरशैव व्हिजनपर्यंत पोहोचली. तेव्हा व्हिजनने तिला मदत करण्याचा शब्द दिला आणि तो निर्णय थांबवण्याची विनंती केली.

मग वीरशैव व्हिजनने समाजबांधवांना तिच्या परिस्थितीची जाणीव करून दिली आणि मदतीचे आवाहन केले. यामध्ये महापालिकेचे निवृत्त अधिकारी वैजनाथ स्वामी यांनी 25 हजार व सिव्हिल इंजिनियर दिपक मड्डे यांनी 11 हजार दिले. पाहता पाहता 2 आठवड्यात 1 लाख रुपये जमले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या इंदुमती अलगोंड-पाटील यांनी कार्यक्रमात 25 हजार रुपये जाहीर केले. आणि कार्यक्रम झाल्यानंतर गौरीला सुपूर्द केले. जवळपास तिच्या संपूर्ण फीची व्यवस्था झाली आहे. अशाप्रकारे व्हिजनने तिला दिलेला शब्द पाळला.

यंदाच्या वर्षी वीरशैव व्हिजनच्या स्थापनेला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. ती सोलापूरला आली असता श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अलगोंड-पाटील यांच्या हस्ते व सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमित रोडगे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर वैजनाथ स्वामी व सिव्हिल इंजिनिअर दीपक मड्डे, वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या उपस्थितीत एक लाखाचा धनादेश गौरीच्या हातात सुपूर्द करण्यात आला. अशाप्रकारे वीरशैव व्हिजनची तपपूर्ती साजरी करण्यात आली.

यावेळी सोलापूर जनता सहकारी बँक जुळे सोलापूर शाखेचे व्यवस्थापक बसवराज मद्दरकी, संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, संजय साखरे, महिला आघाडीच्या सचिवा माधुरी बिराजदार, बद्रीशकुमार कोडगी, अविनाश हत्तरकी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी हौदे यांनी तर आभारप्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित कलशेट्टी, सिद्धेश्वर कोरे, अमोल कोटगोंडे, नागेश पुळुजकर यांनी परिश्रम घेतले

Tags: वीरशैव व्हिजनशिष्यवृत्ती
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

Next Post

“दादा, आम्ही माणसं साधी परंतु काम टॉपचेच करतो” ; पुण्याच्या JW Marriott मध्ये ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे थाटात लोकार्पण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“दादा, आम्ही माणसं साधी परंतु काम टॉपचेच करतो” ; पुण्याच्या JW Marriott मध्ये ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे थाटात लोकार्पण

"दादा, आम्ही माणसं साधी परंतु काम टॉपचेच करतो" ; पुण्याच्या JW Marriott मध्ये 'प्रतिबिंब प्रतिष्ठान'चे थाटात लोकार्पण

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986492
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group