सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या विजापूर रोडवरील माया स्पा मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत विशाल चंद्रकांत धोत्रे वय ३२ वर्षे राहणार नुराणी मस्जीद च्या पाठीमागे झोपडपट्टी नंबर १ जुना विजापूर नाका, सोलापूर आणि माया फॅमिली स्पा चा मालक नामे संदेश साळवे राहणार ठाणे यांना अटक केली आहे.
माया फॅमिली स्पा सेंटर अत्तार कॉप्लेक्स नोबेल हॉऊस दुसरा मजला, विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरुन दि.२३/०५/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता गेले असता आरोपीने पोलीस बिल्डींगमध्ये येऊ नये म्हणून लिफ्ट बंद केली होती तसेच जिन्याचे लोखंडी गेट कुलूप लावून बंद केले होते. शेजारी बिल्डींग मध्ये असलेली लोखंडी शिडी पोलीसांनी शिताफिने मिळवून पहिल्या मजल्यावर प्रवेश करून छापा टाकला. त्या ठिकाणी ०४ पिडीत महिला मिळून आल्या. पिडीतांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत होता. सदर स्पा सेंटर हे आरोपी नामे विशाल चंद्रकांत धोत्रे वय ३२ वर्षे राहणार नुराणी मस्जीद च्या पाठीमागे झोपडपट्टी नंबर १ जुना विजापूर नाका, सोलापूर आणि माया फॅमिली स्पा चा मालक नामे संदेश साळवे राहणार ठाणे म्हणून त्यांचेवर मपोह अकिला युसुफ नदाफ यांचे फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गुरंन. २२३/२०२५ येथे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५, ६ सह भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १४३ (२) (३) १४४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत असून आरोपींना न्यायालयाने आरोपीची गुन्हयाचे तपासकामी दिनांक 2७/०५/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरिक्षक महादेव राऊत, सफौ. हेमंत मंठाळकर, पोहेकॉ/महादेव बंडगर, मपोहेकॉ/अकिला नदाफ, मपोहेका सुशिला नागरगोजे, मपोहेकॉ/नफिसा मुजावर, मपोकॉ/ सुजाता जाधव, मपोकों/ सीमा खोगरे, मपोकों/ उषा मळगे, मपोकॉ/१२२७ चिकमळ पोहे/१४१७ शैलेश बुगड नेमणूक गुन्हे शाखा चालक पोकॉ/७२४ दादा गोरे यांनी शिताफिने कामगीरी करून सदरचा छापा यशस्वी केला.