जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा
सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा झाला असून काडादी चाळ येथील दोघांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून ऑफिस जाळण्याची धमकी दिली आहे.
रोहित राजकर्ण घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसवराज श्रीशैल तूपद, बापू गोविंद कोकरे, रा. काडादी चाळ, सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. २१/०५/२०२५ रोजी २२.१५ वाजन्याचे सुमारास, रेल्वे स्टेशन गांधी पुतळ्यासमोर घडली.
यातील फिर्यादी व फिर्यादीचे वरीष्ठ तंत्रज्ञ सतिश शिरसट, विकास वाळके, सुनिल वाघमोडे व विदयुत सहाय्यक रियाज शेख असे मिळुन नमुद ठिकाणी सरकारी लाईट पोल दुरुस्तीचे काम पाहत असताना नमुद आरोपीतांनी फिर्यादीचे रामलाल चौक येथील कार्यालयात जावून फिर्यादीस व कर्मचारी यांचे मोबाईलवर फोन करुन शिवीगाळ करुन लाईट का बंद करता, तु कोठे आहे सांग तेथे येवून तुला बघतो अशी शिवीगाळ दमदाटी करुन नमुद ठिकाणी येवून फिर्यादी हे करीत असलेल्या शासकिय कामात अडथळा निर्माण करत नमुद आरोपीत यांनी फिर्यादीस तुम्ही लाईट का चालु करत नाही म्हणून शिवीगाळ करीत होते. तेवढयात आरोपीत क्रं. १ याने फिर्यादीच्या गालावर जोरात चापट मारली व तसेच फिर्यादी सोबत असलेले कर्मचारी यांना देखील आरोपीत क्रं. २ याने तुला हेच करु शकतो लाईट सप्लाय किती वेळात चालु करतो ते सांग जर थोडया वेळात लाईट नाही आली तर तुमचे ऑफिस जाळुन टाकतो असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करुन सरकारी कामात अडथळा आणला आहे.