“दादा, आम्ही माणसं साधी परंतु काम टॉपचेच करतो” ; पुण्याच्या JW Marriott मध्ये ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे थाटात लोकार्पण
सोलापूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्यावतीने पत्रकारांच्या मुला मुलींच्या उज्वल भविष्यासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. पुण्याच्या JW Marriott या पंचतारांकित हॉटेलमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, मंत्रालय पत्रकार संघटनेचे दिलीप सपाटे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या उपस्थितीत झाले.
राजा माने यांनी प्रास्ताविकात प्रतिबिंब प्रतिष्ठान काढण्यामागील उद्देश सांगताना हे प्रतिष्ठान गरजू पत्रकारांच्या मुला मुलींसाठी प्रामाणिकपणे काम करेल असा शब्द माने यांनी यावेळी दिला.राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिशा मिळण्यासाठी डिजिटल मीडिया पॉलिसी जाहीर झाली पाहिजे अशी मागणी राजा माने यांनी केली. याच वेळी एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये कार्यक्रम कशाला असा प्रश्न चंद्रकांत दादांनी केला होता ती आठवण सांगत “दादा, आम्ही माणसे साधी आहोत परंतु काम टॉपचेच करतो” असे सांगून आपल्या कार्याचे प्रतिबिंब स्पष्ट केले.