सोलापूर पुणे महामार्गावर भिगवण जवळ ढगफुटी ; हायवेवर आले पाणी, पाच किलोमीटर ट्रॅफिक जाम
सोलापूर : पावसाळा अजून पंधरा दिवस बाकी असताना अवेळी सुरू झालेल्या पावसाने सोलापूर पुणे महामार्गावर भिगवन जवळ तब्बल पाच किलोमीटर ट्राफिक जाम झाले होते. पुण्याहून भिगवन जवळ रस्त्यावर पाणी आल्याने एक वाहन वाहून गेल्याचे सांगण्यात आले त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी दक्षता म्हणून एक एक करून वाहने सोडली त्यामुळे सलग पाच किलोमीटर रांगा दिसून होत्या.
भिगवन जवळ ढगफुटी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ओढे नाल्यानी रौद्ररूप धारण केल्याचे दिसून आले.