Friday, September 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मनीष काळजे म्हणजे सोलापूरचे ‘सीएमओ’ कार्यालय ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 February 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या जिल्हाप्रमुखाची धुरा सांभाळणारे युवा नेतृत्व मनीष काळजे यांची ओळख “सोलापूरचे सीएमो कार्यालय” अशी बनली आहे. राजकारणातील गुरु एकनाथ शिंदे आणि आपले आदर्श व्यक्तिमत्व असणारे तानाजी सावंत यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी जनसेवा आरंभली आहे. अल्पावधीतच सोलापुरातील अनेक प्रश्नांची काळजीने हाताळणी करून त्यांनी ते तडीस लावल्याने सोलापूरचे सीएमो कार्यालय अशीच त्यांची खास ओळख बनली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन आपल्या शिष्याच्या पाठीवर हात टाकून लढण्याचा संदेश त्यांना दिला आहे. अल्पावधीत होणारी ही प्रगती पाहून ज्याप्रमाणे सर्व क्षेत्रात पाय खेचू वृत्ती असते अशाच पद्धतीने त्यांच्यावरही टीका टिप्पणी झाली. मात्र ‘हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार’ या उक्ती प्रमाणे त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे हे विशेष .


शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीरसभेने प्रभावित होत खांद्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा घेत शालेय वयातच शिवसैनिक बनलेले बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे  जिल्हाप्रमुख मनिष अजय काळजे या वादळी व्यक्तीमत्त्वाचा जिवनातील संघर्ष देखील तितकाच तुफानी स्वरूपाचा आहे. शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंड यांना सामाजिक क्षेत्रातील गुरू तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय गुरू मानणार्‍या काळजे यांनी संघर्षाच्या आपल्या वाटचालीत स्वकियांना देखील लढा देत आपले स्थान अढळ ठेवले आहे.


युवा सेनेचा जिल्हाप्रमुख असताना मनीष काळजी यांनी तत्कालीन संपर्कप्रमुख नामदार तानाजी सावंत यांचे आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात केली. त्यांच्या या काळात त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली याची दखल दस्तर खुद्द आदित्य ठाकरे यांनीही घेतली होती मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांचा प्रभाव होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर मनीष काळजे यांनीही शिवसेनाला जय महाराष्ट्र केला आणि शिंदे गटात प्रवेश केला. येथूनच मनीष काळजी यांच्या कार्याला घरी झळाली मिळाली. मनीष काळजे यांचे कार्य माहिती असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांची जिल्हाप्रमुख पदी निवड केली आणि विशेष म्हणजे त्यांच्या सेवालय कार्यालयास  भेट दिली. त्याचवेळी संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्हा वासियांना मनीष काळजे हे एकनाथ शिंदे यांच्या किती जवळचे आहेत, याची जाणीव झाली. कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य तर सर्वांना माहितीच आहेत मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गोरगरीब रुग्णांसाठी जे कार्य केले ते आदर्शवत ठरले आहे. गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करून देणे, दवाखान्यातील जास्त झालेले बिल कमी करणे कशाचीही अडचण आली तर तत्काळ धावून जाणे या त्यांच्या कार्यशैलीमुळे युवा वर्ग त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.  त्यांच्या सेवालाल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीब रुग्णांना मदत केली आहॆ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रयत्नातून त्यांनी अनेक प्रश्न शहराचे मार्गी लावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचायचे असल्यास अथवा त्यांच्याकडे काही काम मनीष काळजे  हे दोघांच्या मधील दुवा ठरत आहेत. त्यामुळेच जिल्हाधिकारी असो  वा महापालिका आयुक्त असो त्यांच्याजवळ ज्या कामाचे निवेदन जाते त्या निवेदनाची प्रत काळजे यांच्या सेवालय या कार्यालयात ही जाते हे सत्य आहे



कोरोना काळातील कार्य उल्लेखनीय

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक रुग्णांसाठी दिवसरात्र काम केले. रुग्णांची सोय करीत हॉस्पिटलमधील बिलांच्या संदर्भात ती कमी करून मिळण्यासाठी काम केले. याची पोचपावती म्हणून खा. श्रीकांत शिंदे व मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क समन्वयक या पदाची जबाबदारी मनिष काळजे यांच्यावर सोपविली. या माध्यमातून काम करत असताना महाराष्ट्रात सर्वप्रथम सोलापूर येथील सर्व हॉस्पिटल समोर बिलांच्या संदर्भात असणार्‍या माहितीचे जी.आर. फलक स्वरूपात लावले.



शेरास सव्वा शेर

सर्व सामान्य स्तरातून पुढे येत असलेल्या मनिष काळजे यांच्या सोबत  राजकीय वर्तुळातून विरोधक वाढल्याने अनेकवेळा संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. यातूनच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रसंगी अनेकजण मनिष काळजे यांच्या पाठीशी उभे राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेल्यावर सोलापूर शहरात काळजे यांचे नाव मोठे झाले.  अनेकांना हे बघवले नाही त्यामुळेच विनाकारण खोट्या अफवा पसरून त्यांना बदनाम करण्याचा चंग त्यांच्या विरोधकांनी रचला. मात्र लेहरो के साथ तो कोई भी तेर सकता है पर असली इंसान वो है जो लेहर को चीर के आगे निकलता है या म्हणीप्रमाणे ते या सर्वांकडे दुर्लक्ष करत पुढे जात आहेत.


शिवा संघटनेतून राजकीय ओढ

वडील अजय काळजे हे वीरशैव शिवा संघटनेचे सक्रिय कार्य कर्ते होते. यातूनच मनिष यांच्या मनात शिवा संघटनेविषयी आकर्षण वाढले. 2008 साली लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुंबईत आंदोलन झाले होते. यावेळी नववीत शि कत असलेल्या मनिष काळजे यांना पहिल्यांदा मुंबईतील विधानभवनात प्रा. मनोहर धोंड यांच्या सोबत जाण्याचा योग आला. त्यावेळी अशोकराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी विधानभवनात अनेक आमदार, मंत्री यांच्या समवेत बैठक झाली. अनेक मागण्यांना त्या वेळी यश आले. तिथूनच शालेय वयातील मनिष काळजे यांच्या मनात समाजकारण आणि राजकारणाची ओढ निर्माण झाली.



आरोग्य विषयी मोठी चळवळ उभा करण्याचा मानस

भविष्यात देखील आरोग्यभविष्यात देखील आरोग्यविषयक सोलापूरमध्ये मोठी चळवळ उभारणे आणि आयटी कंपनीभविष्यात देखील आरोग्यविषयक सोलापूरमध्ये मोठी चळवळ उभारणे आणि आयटी कंपनीसाठी प्रयत्न करण्याचा मनीष काळजे यांचा मानस आहे प्रत्येक भाषणात अथवा मुलाखतीत त्यांनी हे जाहीर केले आहे.



राजकीय प्रवास

वयाच्या 17 व्या वर्षी ते कुमठा नाका भागातील शि वसेना शाखेचे शाखाप्रमुख बनले.

2009 साली विधानसभा निवडणुकीत बूथ यंत्रणेत काम केले.

2010 मध्ये सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुलत चुलते संजय काळजे यांनी उमेदवारी दाखल केली होती. तेंव्हा 13 दिवस मनीष यांनी प्रचारात सहभाग घेतला.

2015 साली युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून मनीष यांना जबाबदारी मिळाली. 2015 ते 2017 पर्यंत पक्षाचे काम जोमाने केले.

2021 मध्ये युवा सेना जिल्हाप्रमुख बनले

2022 मध्ये एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बनले.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ स्वामींचा ग्रामसेविकांना मोलाचा सल्ला ; उत्तम आरोग्यासाठी दिल्या या ‘टिप्स’

Next Post

‘एमआयएम’चे सलीम पामा व दौला कुमठे यांची पुन्हा काँग्रेसशी जवळीक? ; वाहिद-जाविद भाई बहुत बढिया

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'एमआयएम'चे सलीम पामा व दौला कुमठे यांची पुन्हा काँग्रेसशी जवळीक? ; वाहिद-जाविद भाई बहुत बढिया

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999647
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group