Friday, September 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सीईओ स्वामींचा ग्रामसेविकांना मोलाचा सल्ला ; उत्तम आरोग्यासाठी दिल्या या ‘टिप्स’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 February 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – कामाला देव माना, कर्माला महत्व द्या, ताणतणावामुळे स्वास्थ्य बिघडते, म्हणून ग्रामसेविकांनी  आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. 

सिंहगड शिक्षण संकुलात जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग व महिला बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने महिला ग्रामसेवकांसाठी महिला सक्षमीकरण व प्रशासकीय सुधारणा  कार्यशाळाघेणेत आली.यावेळी सिईओ दिलीप स्वामी बोलत होते.  या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, महिला व बाल कल्याण विभागाचे मोहीम अधिकारी जावेद शेख, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभा साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी तनपुरे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, व्याख्याता सीता पाटील आदी उपस्थित होते. 

सिईओ दिलीप स्वामी यांनी महिला ग्रामसेवका यांचेसाठी खास या महिला सक्षमीकरण कार्यशीळेचे आयोजन करणेत आले होते. योगा, पोहणे, व्यायाम, ध्यान, पायी चालणे छंद जोपासा, सुर्यनमस्कार विविध व्यायामाचे प्रकार सिईओ स्वामी यांनी सांगितले. मनातलं मैत्रिणींशी बोला. कामाचे व वेळेचे नियोजन करा. वाचायला शिका. भावना व्यक्त करायला शिका. संवाद कौशल्य जोपासा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

महिलांना दुय्यम स्थान – सुहासिनी शहा 

……………………….

महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत अधिक सक्षम आहेत. परंतु समाजव्यवस्थेने त्यांना दुय्यम स्थान दिले आहे. फक्त ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात सुद्धा महिलांना आजही दुय्यम स्थान दिले जाते. महिलांनी स्वतः मध्ये आत्मविश्वास वाढवावा. स्वतःला कधीही दुय्यम समजू नका. महिलांमध्ये धैर्याची कमी नाही. त्या कोणत्याही परिस्थितीस पुरुषांच्या तुलनेत धैर्याने तोंड देतात. ग्रामसेविकांना ग्रामीण भागात काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रशासकीय सुधारणांबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत यावेळी शहा यांनी व्यक्त केले. 

ताणतणाव लक्षात येत नाही  – सिईओ स्वामी

………………….. 

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे सांगणारे संत सावता महाराज यांना कामात देव मानला.कामाला महत्व द्या. सकारात्मक रहा, आनंदी रहा असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, ताणतणाव चे परिणाम लक्षात घ्या. छोटे प्रसंगांतून ताणतणाव निर्माण  होतो.  प्रेशर कुकर सारखे राहू नका. ताणतणावाचे व्यवस्थापन करा. आरोग्याची काळजी घ्या. महिलांमधील शक्तीची ओळख करून देण्यासाठीच आजच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यामागील उद्देश आहे. आमच्या महिला ग्रामसेविका या ग्रामीण भागात काम करताना त्या आत्मविश्वासाने येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाव्यात. त्यांच्या प्रशासकीय कामकाजांच्या सुधारणे बरोबरच आरोग्याच्या समस्या जाणून घेवून त्याबाबत त्यांच्यात जागृती निर्माण करणे हाही उद्देश या कार्यशाळेचे आयोजन करण्यामागे आहे. 

ग्रामपंचायत अधिनियमाचा चांगला. अभ्यास करा – अतिरिक्त सिईओ कोहिनकर 

……………..

ग्रामपंचायतीच काम सक्षम पणे करणे साठी नियमांचा अभ्यास करा जेणे करून लोकांना वेळेत सेवा देता येतील असे मत अतिरिक्त सिईओ संदीप कोहिनकर यांनी व्यक्त केले. सरपंचाना अपात्र तोटी कारवाई केले नंतर एप्रिल करणे साठी व पडताळणी साठी किती दिवसाचा कालावधी आहे? ग्रामपंचायतीच् नमुना रजिस्टर,सरपंच व उपसरपंच, मासिक सभा व ग्रामसभेचे अधिकार याबाबत उलट प्रसंगी विचारून मार्गदर्शन केले . परिपत्रक व वरिष्ठ कार्यालयाकडून येणारे पत्रव्यवहार याची काळजीने अभ्यास करा. अतिक्रमणाबाबत नियमांची माहिती करून घ्या. कामात यामुळे अडथळे निर्माण होणार नाहीत. असेही अतिरिक्त सिईओ संदीप कोहिनकर यांनी सांगितले. 

अधिकाराची जाणीव ठेवा – शेळकंदे 

………………

इशाधीन शेळकंदे म्हणाले महिला ग्रामसेविकांनी आपले कामकाज करताना महिला सरपंच व सदस्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व ग्रामपंचायत कामकाजाविषयी महिती देण्याचे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे. आपल्या अधिकाराची जाणीव झाल्याशिवाय महिला खऱ्याअर्थाने सक्षम होणार नाहीत. 

प्रास्ताविक जिल्हा मोहीम अधिकारी जावेद शेख यांनी केले. सुत्रसंचलन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव व अंगणवाडी पर्यवेक्षिका माधवी शिंदे यांनी केले. कार्यशाळेच्या नियोजनासाठी  गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका ज्योती पाटील यांनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

मनसे विद्यार्थी सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी अभिषेक रंपुरे यांची नियुक्ती

Next Post

मनीष काळजे म्हणजे सोलापूरचे ‘सीएमओ’ कार्यालय ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मनीष काळजे म्हणजे सोलापूरचे 'सीएमओ' कार्यालय ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999647
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group