Wednesday, June 18, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Breaking ! आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 April 2024
in crime
0
Breaking ! आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
0
SHARES
6.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Breaking ! आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

सोलापूर : शहरामध्ये सनसनाटी ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपले असून शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

1)सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे 2)रविराज दत्तात्रय शिंदे 3)अभिजीत उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे 4)प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे 5)निलेश प्रकाश महामुनी
6) तैसिफ गुडूलाल विजापुरे 7)नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

यात थोडक्यात हकीकत अशी की, सन 2004 मध्ये सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा खून आबा कांबळे व त्याचे साथीदारांनी घडवून आणला होता, मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने दिनांक 07/07/2018 रोजी सुरेश उर्फ गामा शिंदे वगैरे वर नमूद आरोपींनी मिळून आबा कांबळे याचा मोबाईल गल्ली येथे धारदार शस्त्राने खून केला अशा आशयाची फिर्याद फिर्यादी शुभम श्रीकांत धूळराव यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. सदरचा खटला हा विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती संगीता आर. शिंदे यांचे न्यायालयासमोर चालला. खटल्याकामी सरकार पक्षातर्फे एकूण 28 साक्षीदार तपासण्यात आले. दिनांक 07/08/2019 रोजी सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्र.1 यास तपासले होते.

न्यायालयाने निकाला करीता दिनांक. 26/04/2024 अशी तारीख नेमली होती.
शुक्रवारी दुपारी 1 .10 चे सुमारास न्यायालयाने आरोपी व आरोपींच्या वकिलांसमोर निकालाचे वाचन केले, त्याप्रमाणे सर्व सातही आरोपींना भा.द.वी कलम 302, 120ब, 143, 147, 148, 149 व शस्त्र कायदा कलम 4, 25 अन्वये दोषी धरले तर अनुसूचित जाती व  जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3(2) (va) अंतर्गत गुन्हा शाबित झाला नसल्याचे मत नोंदवले. त्यानंतर आरोपींचे वकिलांना शिक्षेबद्दल काही सांगायचे आहे का अशी विचारणा न्यायालयामार्फत करण्यात आली. शिक्षेबद्दल आरोपींतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की, “सदरची घटना ही दुर्मिळातली दुर्मिळ नाही, आरोपी नंबर 1 हे 81 वर्षाचे वयोवृद्ध इसम आहेत तर काही आरोपींना लहान मुले व परिवाराची जबाबदारी आहे, त्यामुळे कमीत कमी शिक्षा देण्यात यावी” त्यावर सरकार तर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, “मयत आबा कांबळे याच्या शरीरावर 58 वार असून त्याची निर्घृण हत्या केली आहे, त्यामुळे आरोपींना 25 वर्षाची शिक्षा देण्यात यावी व आबा कांबळे याचे पत्नीस नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक आरोपीने दोन लाख देण्याचा आदेश करण्यात यावा” तदनंतर आरोपींचे वकिलांनी सरकार पक्षातर्फे केलेल्या मागणीस विरोध केला व असा युक्तिवाद केला की, “25 वर्षाची शिक्षा द्यावी असे या स्टेजला म्हणता येणार नाही, गुन्ह्यास फक्त शिक्षा फाशी किंवा जन्मठेप अशीच तरतूद आहे, त्यामुळे 25 वर्षे शिक्षेची मागणी करता येणार नाही, आरोपी हे गेल्या साडेपाच वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, सरकार पक्षाचे मागणीप्रमाणे दोन लाख देण्याची आरोपींची ऐपत नाही” दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने मध्यांतर नंतर निकाल दिला जाईल असे सांगितले..

मध्यंतरानंतर मा. न्यायालयाने आरोपीना भा. द. वी. कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व  प्रत्येकी 10,000 दंड, दंड न भरल्यास 3 महिन्यांचा कारावास, शस्त्र कायदा अंतर्गत 1 वर्षाची शिक्षा व प्रत्येकी 5,000/- दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याचा कारावास तसेच भा. द.वि कलम 148 अंतर्गत 1 वर्ष शिक्षा व प्रत्येकी 2000/- दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याची शिक्षा सुनावली.

यात आरोपींतर्फे ॲड. श्रीकांत जाधव, ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. शिव झुरळे, ॲड. आकाश देठे तर सरकारतर्फे ॲड. प्रदिपसिंग रजपूत यांनी काम पाहिले.

Tags: Solapur courtSolapur crimeआबा कांबळे खून
SendShareTweetSend
Previous Post

तरुणाईचा निर्धार ; यंदा प्रणितीताईनाचं खासदार करणार ; सरपंच श्रीदिप हसापुरे व गंगाधर बिराजदार यांचा संकल्प

Next Post

सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी महासभा ; एक लाख लोकांसाठी बसण्याची व्यवस्था ; असे आहे नियोजन

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

17 June 2025
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

17 June 2025
‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

17 June 2025
सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

16 June 2025
IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

16 June 2025
अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र

अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र

16 June 2025
सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष

सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष

16 June 2025
सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

15 June 2025

क्राईम

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

by प्रशांत कटारे
9 June 2025
0

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय-३२ रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1767239
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group