तरुणाईचा निर्धार ; यंदा प्रणितीताईनाचं खासदार करणार ; सरपंच श्रीदिप हसापुरे व गंगाधर बिराजदार यांचा संकल्प
दक्षिण सोलापूर : सोलापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत निंबर्गी गावचे सरपंच श्रीदीप हसापुरे यांनी गावच्या विकासाकरिता भरीव निधी उपलब्ध होण्यासाठी प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याचे युवकांना आवाहन केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, त्याचा फटका निश्चितच भाजप उमेदवाराला बसेल आणि प्रणिती शिंदे यांना दक्षिण मधून मोठे मताधिक्य मिळाले आणि त्या दोन लाखाच्या फरकाने विजयी होतील.
गंगाधर बिराजदार हे बोलताना म्हणाले, गेले दोन खासदार निष्क्रिय असल्यामुळे शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न असलेला कॅनॉलला पाणी आले नाही, शेतमालाला हमीभाव नाही, पीकविमा नाही,तालुक्यात प्रचंड दुष्काळ असताना निष्क्रिय आमदार व खासदारामुळे तालुका दुष्काळाच्या यादीत बसला नाही असल्या दुष्काळात शेतकऱ्यांना सवलती देण्याऐवजी शेतकऱ्यांकडून सारा व विविध करापोटी रकमा सक्तीने वसुल केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भाजपाच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट आहे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला आता घरी बसवण्याच काम करण्याचं शेतकरी व तरुण वर्ग नक्की करणार आहे
उपसरपंच पीरसाब हवालदार म्हणाले, लोकप्रतिनिधीनी विकास कामाना निधी द्यायचा सोडून आलेला निधी आडवायचं काम करीत असल्याने विकास कामे ठप्प झालेली आहेत असे सांगितले आपल्या पक्षाचे आमदार खासदार निवडून द्या दुप्पट वेगाने निंबर्गी गावात विकास निधी येईल असे सांगितले
सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या लोकप्रिय उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना भरघोस मताने निवडून आनण्याचा निर्धार युवकांनी केला उपस्थित गावातील युवकांनी आपापले वैयक्तिक मत मांडत, प्रचाराची रननीती आखत सूचना केल्या