सोलापूर – दक्षिण पंचायत समिती मधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना पक्ष घाताचा झटका आलेनंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांनी आपल्या संवेदनशिलतेचा प्रत्यय देत अश्विनी हाॅस्पीटल येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून धीर दिला.
कुटुंब प्रमुख म्हणून सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दाखविलेले संवेदनशीलतेमुळे कर्मचारी यांचे मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कामकाज करताना पक्ष घाताचा त्याचा झटका आला. दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने अश्विनी हॉस्पिटल येथे 15 मिनिटात दाखल केले. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने उजव्या हात पायात ताकद कमी झाली आहे. त्यांचे उपचार सुरू आहेत.
परंतु अश्विनी हाॅस्पिटल मध्ये दाखल करणेत आले असले बाबतची माहिती सिईओ यांचे स्वीस सहाय्यक देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे निदर्शनास आणून दिले नंतर संध्याकाळी अश्विनी हॉस्पिटल येथे येऊन गायकवाड यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अग्रवाल यांच्याशी अर्धा तास बसून चर्चा केली. आपल्या जिल्हा परिषदेच्या कुटुंबातील एका सदस्यावर झालेल्या आघातावर त्यांनी अत्यंत संवेदनशीलता बाळगुन आज अश्विनी हॉस्पिटल येथे येऊन कर्मतारी यांचे विचारपूस केले बदल जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वतीने मनापासून त्यांच्या संवेदनशीलते बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.