Tuesday, September 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 May 2025
in political
0
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने
0
SHARES
393
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गुरुवारचा सोलापूर दौरा चांगलाच आठवणीत आणि चर्चेचा राहणारा ठरला. प्रशासनाकडून सुरुवातीला आलेल्या दौऱ्यात पुन्हा बदल करून त्यामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट वाढवण्यात आली. या दौऱ्यात दोन्ही देशमुख आमदारांच्या निवासस्थानी भेटीचा उल्लेख नव्हता.

त्यामुळे याबाबत माध्यमांमधून चर्चाही झाली. सकाळी लवकरच बावनकुळे सोलापुरात दाखल झाले विमानतळावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांना भगवद्गीता पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर हा ताफा थेट युवा आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयाकडे रवाना झाला.
या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आजपर्यंत डावलण्यात आलेले जुने कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य बावनकुळे यांच्या स्वागताला थांबून होते.

तिथे सत्कार स्वीकारत कोठे यांच्या परिवारासोबत आणि जुन्या कार्यकर्त्यांसोबत नाश्त्याचा आस्वाद त्यांनी घेतला. याच ठिकाणी भावी नगरसेवकांची सुद्धा मांदियाळी पाहायला मिळाली. एका कार्यक्रमात बावनकुळे यांनी आमदार कोठे यांचे भरभरून कौतुक केले. सोलापुरात देवेंद्र निवडून आल्यानेच राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली असे सांगत कार्यकर्त्यांचा उर भरून आणला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250529-WA0069.mp4

प्रदेशाध्यक्ष यांच्या दौऱ्यात ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, दुसरे जेष्ठ आमदार सुभाष देशमुख हे दोघेही कोणत्या कार्यक्रमाला आणि बैठकीला दिसून आले नाहीत. आमदार सुभाष देशमुख हे सोलापुरातच होते पण ते बैठकीला नव्हते. शहरातील बरेच कार्यक्रम उरकून बावनकुळे सायंकाळच्या सुमारास होटगी रोडवरील आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी चहाला गेले.

सुभाष बापू पण तसे कच्चे खिलाडी नाहीत. त्यांनी त्या ठिकाणी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांना चहाला बोलवून त्यांच्याच हस्ते बावनकुळे यांचा सत्कार केला. एकूणच चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा जुन्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन जाणारा ठरला परंतु त्यांनाही नाराजांची मने सांभाळावी लागली हे मात्र तितकेच खरे आहे.

Tags: BJPChandrashekhar bavankuleDevendra kotheSubhash Deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

Next Post

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998298
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group