सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट
सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून सोलापुरातून नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी गोव्याला गेले आहेत.
राजशेखर कुदरी असे त्या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो शहरात उत्तर कसबा नवी पेठ या ठिकाणी राहत होता. कसबा गणपती मंडळाचा कार्यकर्ता असल्याने आपल्या मित्रांनी असे पाऊल का उचलले याबाबत मित्रांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
पत्नी, 2 मुलं, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. मागील दीड महिन्यापासून तो गोवा या ठिकाणी राहत होता. मृतदेह आणण्यासाठी कुटुंबिय गोव्याला गेले असून आज गुरुवार सायंकाळी लिंगायत स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मित्र परिवाराकडून मिळाली.