Saturday, July 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“मला हलगर्जीपणा चालणार नाही” ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात अधिकाऱ्यांना सुनावले, या महत्त्वाच्या बाबीला दिले प्राधान्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 November 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 21( जिमाका):- कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे लाखो भाविक, वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येतात. या सर्व भाविकांना जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु ही कार्तिकी वारी, स्वच्छतेची वारी ठरावी यासाठी येथे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

कार्तिकी शुद्ध एकादशी दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होत आहे. दिनांक 27 नोव्हेंबर पर्यंत पासून यात्रा कालावधी पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व वारकरी व भाविकांना स्वच्छतेच्या अनुषंगाने दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्यावतीने सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. पंढरपूर येथे किमान आठ ते दहा लाख भाविक येथील असे गृहीत धरून प्रशासनाच्या वतीने सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने सुलभ इंटरनॅशनल कायमस्वरूपी शौचालय, प्री फॅब्रीकेटेड शौचालय, कायमस्वरुपी सार्वजनीक शौचालय उपलब्ध करण्यात आली आहेत. या ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा तसेच साफसफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शहरामध्ये कुठेही कचरा साठू नये यासाठी अनेक ठिकाणी कचराकुंडी तसेच तेथून कचरा घेऊन जाण्याची व्यवस्था केलेली असून शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी नगर परिषदेच्यावतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. भाविकांना पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शहरात येणाऱ्या मुख्य मार्ग तसेच शहरात अनेक ठिकाणी तसेच दर्शन रांग व मंदिर परिसरात व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे येणाऱ्या भाविकांनी रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नये.नगरपालिकेने उपलब्ध करून देण्यात आलेल्या कचराकुंडीतच कचरा टाकावा व शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे.

यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर येथे येत असल्याने शहरात सर्वत्र स्वच्छता चांगली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. यात्रा कालावधीत स्वच्छतेबाबत प्रशासन मंदिर समिती यांनी स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनाचे प्रभावी अंमलबजावणी करावी याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी निर्देश दिलेले आहेत. तसेच स्वच्छतेबाबत ज्या सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी जिल्हाधिकारी यांनी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याबाबत सूचित केले आहे.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कार्तिकी यात्रा कालावधी पंढरपूर शहर स्वच्छ रहावे यासाठी  प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अर्चना गायकवाड, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव,कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, तालुका आरोग्य डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री  ढवळे व संबंधित विभाग प्रमुखांना परस्परात योग्य समन्वय ठेवून काम पार पडावे असे आवाहन केले आहे.

दर्शन, पत्राशेड, नदीपात्र वाळवंट, 65 एकर  ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येतात. या शौचालयाची  वेळोवेळी स्वच्छता व मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता करण्यात यावी. तसेच मंदीर परिसर , दर्शन रांग, नदी पात्र, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेसाठी जादा स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. वाळवंटात असणारे दगड, कपडे, कचरा  काढून घ्यावा.  भाविकांना यात्रा कालावधीत स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता ठेवावी. नदी पात्रावरील सर्व घाटांची स्वच्छता करण्यात यावी. दर्शन रांगेजवळ असणाऱ्या तात्पुरत्या विश्रांती कक्षामध्ये भाविकांना औषध उपचार केंद्र, स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, शौचालय आदी सुविधांची उपलब्धता करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिलेल्या आहेत.

कार्तिकी वारी अनुषंगाने येथे येणाऱ्या भाविकांना इतर सोयी सुविधा बरोबरच स्वच्छतेच्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद स्वतः लक्ष घालत आहेत. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तीन ते चार बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेच्या अनुषंगाने मार्गदर्शक दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मंदिर परिसर, नदीपात्र, नदीपात्रावरील घाट, शहरातील महत्वाची ठिकाणे,  65 एकर, कायमस्वरूपी शौचालय या ठिकाणी भेटी देऊन नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नये असे निर्देश दिलेले आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

ओढ्याला पूर आला, दोन बैल गेले होते वाहून शेतकऱ्याला प्रशासनाने दिली एवढ्या हजाराची मदत

Next Post

सिईओ मनिषा आव्हाळे यांचे संवेदनशिलतेने कर्मचारी भारावले ! का गेल्या त्या अश्विनी रुग्णालयात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सिईओ मनिषा आव्हाळे यांचे संवेदनशिलतेने कर्मचारी भारावले ! का गेल्या त्या अश्विनी रुग्णालयात

ताज्या बातम्या

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1987398
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group