Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमचं ठरलंय, जो राम को लाये हैं उनको हम लायेंगे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 April 2024
in political
0
आमचं ठरलंय, जो राम को लाये हैं उनको हम लायेंगे
0
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमचं ठरलंय, जो राम को लाये हैं उनको हम लायेंगे

सोलापूरकरांनी व्यक्त केल्या भावना : श्रीराम नवमी निमित्त आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम जन्मोत्सव मंडळांना भेटी

सोलापूर : ज्यांनी तीर्थक्षेत्र श्री अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी प्रचंड संघर्ष केला आणि मंदिर बांधणीही केली, अशा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याची भावना सर्वसामान्य सोलापूरकरांनी बुधवारी व्यक्त केल्या. निमित्त होते श्रीराम नवमीचे.

‘जो राम को लाये है उनको हम लायेंगे’ या गीताने शहरात सर्वत्र भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे जल्लोषात स्वागत झाले. आमदार राम सातपुते यांनी साखरपेठ येथील हिंदूसाम्राज्य मंडळ, मंगळवार पेठ येथील वंदे मातरम मित्र मंडळ आदी मंडळांना भेटी देऊन त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे मनोभावे पूजन केले.

यावेळी माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी नगरसेवक जगदीश पाटील, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य उदयशंकर पाटील, सतीश महाले आदी उपस्थित होते.

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतरची यंदाची पहिलीच रामनवमी असल्यामुळे सोलापूरकरांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. रांगोळी काढून, भगवे झेंडे लावून, फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटून सोलापूरकरांनी श्रीराम नवमी साजरी केली. सोलापूरकरांच्या या आनंदात सहभागी होत भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनीही प्रभू श्रीरामांना वंदन केले.

यावेळी नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. गेल्या ५०० वर्षांपासून अवघा हिंदू समाज ज्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या जगाने पाहिला. त्याचे आम्हाला प्रचंड समाधान आहे. त्यामुळे यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधी असलेल्या आमदार राम सातपुते यांनाच सर्व सोलापूरकर समर्थन देणार असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.

आमदार राम सातपुते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमुळे श्री अयोध्येमध्ये आज प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर दिसत आहे. आजचा दिवस सर्वांसाठी ऐतिहासिक आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यामुळे यंदा सर्वत्र श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसत आहे अवघे सोलापूर भगवेमय झाल्याचे समाधान असल्याचे भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सांगितले.

यावेळी मोहन गुर्रम, सनी कन्ना, नागेश चेतल, रोहित दुधगुंडी, रोहन चिलवेरी, विनीत कन्ना, नागराज वड्डेपल्ली, तुळशीदास भुतडा, सोनाली मुटकिरी, आनंद गोसकी आदी उपस्थित होते.

Tags: Loksabha election 2024MLA Ram satputeSolapur loksabha electionराम नवमी
SendShareTweetSend
Previous Post

बंजारा समाजाची स्वाती मोहन राठोडने मिळवले यूपीएससी परीक्षेत यश ; देशात या रँकने पास

Next Post

सोलापुरात या रिपाइं गटाचा आमदार प्रणिती शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मोहिते पाटील- शिंदे घराण्याचे ऋणानुबंध भाजपच्या रामाला डोकेदुखी  ; आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मोहिते पाटील ‘प्लस पॉईंट’

सोलापुरात या रिपाइं गटाचा आमदार प्रणिती शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001147
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group