Friday, July 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात वंचितने श्रीशैल गायकवाड यांना डावलले  ! राहुल गायकवाड सोलापूरचे उमेदवार तर माढयाचा उमेदवार ही ठरला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 April 2024
in political
0
सोलापुरात वंचितने श्रीशैल गायकवाड यांना डावलले  ! राहुल गायकवाड सोलापूरचे उमेदवार तर माढयाचा उमेदवार ही ठरला
0
SHARES
336
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात वंचितने श्रीशैल गायकवाड यांना डावलले  ! राहुल गायकवाड सोलापूरचे उमेदवार तर माढयाचा उमेदवार ही ठरला

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीने आणखी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी राहुल गायकवाड यांना तर माढा मतदारसंघा संघात  रमेश बारसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून उमेदवारी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आजपर्यंत सोलापुरात भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि काँग्रेसच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती सुरू आहे. वंचित चा उमेदवार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोलापुरातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड हे इच्छुक होते परंतु पक्षाने त्यांना डावलल्याचे दिसून आले. अखेर सोलापूर व माढा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी एन्ट्री केली आहे. यामुळे आता या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस भाजपा आणि वंचित अशी प्रमुख तिरंगी लढत होणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे.

माढा मतदारसंघातून वंचित कडून मोहोळचे माजी नगराध्यक्ष व ओबीसी नेते रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून यापूर्वी काम पाहत होते. काही दिवसापूर्वी त्यांनी तेथील पदाचा राजीनामा दिला. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने त्यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ते माळी लिंगायत समाजातून येतात.  सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून अक्कलकोट तालुक्यातील बादोले  गावातील राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. ते बौद्ध समाजाचे आहेत.

सन 2019 मध्ये झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची एक लाख 70 हजार सात मते मिळाली होती. भाजपाचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी  काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख 58 हजार मतांनी पराभव केला होता. तर माढा मतदार संघात मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयराव मोरे यांना 51 हजार 532 मते मिळाली होती.

● कोण आहेत राहुल गायकवाड ?

– राहुल काशिनाथ गायकवाड

– मूळ गाव बादोले,

अक्कलकोट तालुका

जिल्हा सोलापूर .

वय – 44

वडिलांचे नाव –

काशिनाथ पुंडलिक गायकवाड

(K.P. GAIKWAD)

एसपी, पोलिस अधिकारी होते.

IPS,

शैक्षणिक पात्रता –

1.सिम्बायोसिस कॉलेज ऑफ कॉमर्समधून वाणिज्य पदवी ,

2.पोस्ट ग्रॅज्युएट , एमबीए, पुणे विद्यापीठाकडून परकीय व्यापार.

सामाजिक उपक्रम –

2009 पासून सक्रिय

-अक्कलकोट ते आळंद/गुलबर्गा या कर्नाटकला जोडणाऱ्या महामार्गासाठी यशस्वी रास्ता रोको केले होते.

Tags: Rahul gaikwadRamesh barskarवंचित बहुजन आघाडी
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात 9 दिवस आंबेडकर जयंती उत्सव ; 21 एप्रिलला मिरवणूक ; मध्यवर्ती अध्यक्षपदी नागेश रणखांबे

Next Post

राम सातपुते यांना 3 लाखापेक्षा अधिक मताधिक्य देणार ; युवा संवाद कार्यक्रमात हजारों तरुणांचा निर्धार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भारतमातेशी गद्दारी करणे हे काँग्रेसच्या रक्तातच ; भाजप उमेदवार राम सातपुते यांचा गंभीर आरोप

राम सातपुते यांना 3 लाखापेक्षा अधिक मताधिक्य देणार ; युवा संवाद कार्यक्रमात हजारों तरुणांचा निर्धार

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1991857
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group