राम सातपुते यांना 3 लाखापेक्षा अधिक मताधिक्य देणार ; युवा संवाद कार्यक्रमात हजारों तरुणांचा निर्धार
शांतीसागर मंगल कार्यालयात युवा सवांद with राम भाऊ सातपुते या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी हजारो तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती, सर्व तरुणांनी सोलापूरात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा खासदार दिल्लीत पाठवण्याचा निर्धार घेतला व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम भाऊ सातपुते यांना यंदा 3 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य देऊन विजयी करण्याचा निर्धार या कार्यक्रमात केला.
याप्रसंगी राम सातपुते म्हणाले, मी देखील 2014 साली तुमच्या सारख्या भाजपचा एक सर्व सामान्य कार्यकर्ता होतो, व भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी आहे जिथे माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला आमदार व आता एका माजी मुख्यमंत्री च्या मुली विरोधात खासदारकीची उमेदवारी मिळाली, यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला की, तुम्हा सारख्या हजारो राष्ट्रप्रेमी युवकांची फौज जर माझ्या पाठीशी असेल तर ही लढाई मी नक्कीच जिंकणार व ती सुद्धा मोठ्या मताधिक्याने जिंकणार असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी शहराध्यक्ष नरेंद्र काळे,जिल्हा सरचिटणीस मनिष देशमुख,रोहिणी तडवळकर यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना पुढील 40 दिवस जागरूक राहून पुन्हा मोदींना प्रधानमंत्री बनविण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे असे सांगितले.