सोलापूरची लेक महाराष्ट्रात नंबर एक !!
सोलापूर – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल आज जाहीर झाला. राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापूरच्या कु. वैष्णवी राम गायकवाड ही मुलीत राज्यात पहिली आली आहे.
वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नु म वि शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण हे दमाणी विद्या मंदिर तर अभियांत्रिकी शिक्षण ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातून झाले आहे.
अभियांत्रिकी प्रथम वर्षी दि बाटू विद्यापीठ मध्ये वैष्णवी ही प्रथम आली होती. मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांची ती कन्या आहे. वैष्णवी ने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे.