Sunday, May 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर महापालिका आयुक्त ओंबासे ऍक्शन मोडवर ; तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई…

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 December 2025
in Solapur SMC
0
सोलापूर महापालिका आयुक्त ओंबासे ऍक्शन मोडवर ; तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई…

Oplus_16908288

0
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिका आयुक्त ओंबासे ऍक्शन मोडवर ; तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई…

सोलापूर — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे रूजू न झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक व सुरळीत अंमलबजावणीस अडथळा निर्माण करणारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत.

तसेच निवडणूक आचारसंहिता पालनासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून स्थिर देखरेख पथक व इतर निवडणूक कामांसाठी नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यालयामार्फत तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी कर्तव्यावर हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले होते.

तथापि, आदेश बजावून देखील काही अधिकारी व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर हजर न राहिल्याचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, सोलापूर महानगरपालिका डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से.) यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

निवडणूक कामकाजात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, क्षेत्रीय अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे रूजू न झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी १०.०० वाजेपर्यंत कर्तव्यावर उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विहित वेळेत उपस्थित न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम ३४ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, निवडणूक कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने, शिस्तबद्धपणे व वेळेत पार पाडावे. निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा आदेशांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Tags: #IAS Sachin ombaseLocal body electionSMC election
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात महायूतीच्या बैठकीपूर्वी शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन ; भाजप सोबत युतीची चर्चा, नक्की काय घडले !

Next Post

काकाचे राष्ट्रवादी कार्यालयापुढे आंदोलन, दुसरीकडे पुतण्या शिवसेनेत दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
काकाचे राष्ट्रवादी कार्यालयापुढे आंदोलन, दुसरीकडे पुतण्या शिवसेनेत दाखल

काकाचे राष्ट्रवादी कार्यालयापुढे आंदोलन, दुसरीकडे पुतण्या शिवसेनेत दाखल

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980261
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group