सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक 20 एप्रिलला ; बोधिसत्व जयंती उत्सव मध्यवर्तीच्या अध्यक्षपदी विकी शेंडगे
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्षपदी विकी शेंडगे, सचिव पदी अविनाश भडकुंबे, उपाध्यक्ष अयाज दिना, दिपक गवळी, संदेश कांबळे, गंगाधर गावडे, खजिनदार दत्ता शिंदे तर कार्याध्यक्ष पदी उमेश रणदिवे यांची निवड करण्यात आली.
रविवार दिनांक 29 मार्च रोजी सायंकाळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर यांच्या वतीने डॉ औदुंबर मस्के यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकारी निवडीची बैठक नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे व प्रमुख पाहुणे डॉ औदुंबर मस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. दिवंगत नेते राहुल सरवदे, केरु जाधव, अशोक भालेराव, सिद्धू उबाळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मध्यवर्ती महामंडळ अंतर्गत येणाऱ्या उत्सव अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे विश्वस्त आनंद चंदनशिवे म्हणाले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती निमित्त बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ माध्यमातून सर्व भीम सैनिकांना घेऊन नूतन पदाधिकारी ऩिवड करण्यासाठी गेल्या 4 वर्षापासून मध्यवर्ती महामंडळाकडून होत आहे. आंबेडकरी चळवळीचा गाडा चालू राहिला पाहिजे म्हणून मध्यवर्ती आहे.
सोलापुरात साजरे होणारे उत्सव याला सहकार्य करणारे पोलिस आयुक्त एम राजकुमार आणि उपायुक्त विजय कबाडे, उपायुक्त दिपाली काळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
यावेळी पप्पू गायकवाड, रॉकी बंगाळे, अजित बनसोडे, विजयानंद उघडे, पंकज ढसाळ, उपाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, रविकांत कोळेकर, सिद्धेश्वर पांडगळे, शांतीकुमार नागटिळक, बबन शिंदे, रसूल पठाण, आर के कांबळे, यशवंत फडतरे, गौतम चंदनशिवे, चंद्रकांत सोनवणे, आशुतोष नाटकर, सुहास सावंत, विष्णू पांडगळे, अविनाश घोडकुंबे, विकी शेंडगे, निशांत बनसोडे, दिपक गवळी, ॲड शिवयोगी सिद्धगणेश, ॲड जयप्रकाश भंडारे, विक्रांत दुपारगुडे, विनोद वाघमारे, लखन भंडारे, दिनेश बनसोडे, नागनाथ गायकवाड, अँड.विशाल मस्के, अश्विन सोनवणे, धम्मपाल मैंदर्गीकर, चाचा सोनवणे, महेश डोलारे, श्री सर्वगोड, कुमार मस्के, अयाज दिना, बाबा गायकवाड इत्यादी मान्यवरांची मंचावर उपस्थित होती.