ब्रेकिंग : दिलीप माने व सुरेश हसापुरे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक नामनिर्देशन पत्राच्या छाननी वेळी माजी आमदार दिलीप माने आणि माजी संचालक सुरेश हसापुरे या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत आल्याने खळबळ उडाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबी चिंचोळी येथील सोसायटी संचालक पिरप्पा घंटे यांनी यांनी या हरकती घेतल्या आहेत.


निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समितीच्या शिवदारे सभागृहात मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता उमेदवारी अर्जाची छाननी सुरू झाली. हरकत घेताना एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवारावर त्याच मतदारसंघात हरकत घ्यावी आणि हरकत लेखी स्वरूपात दोन प्रति मध्ये द्याव्या अशा सूचना गायकवाड यांनी केल्या.
सोसायटी मतदारसंघाने अर्ज छानजीला सुरुवात झाली. सुरेश हसापुरे यांच्या पहिल्याच उमेदवारी अर्जावर पिरप्पा घंटे यांनी दोन प्रतीमध्ये हरकत घेतली. त्यानंतर घंटे यांनी दिलीप माने यांच्या अर्जावर ही तशीच हरकत घेतली. निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी हरकतींवर तीन नंतर सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले.
दरम्यान घंटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की हसापुरे आणि माने हे विकास सोसायटीचे थकबाकी दार असून सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 73 अन्वये त्यांचा अर्ज नामंजूर करावा अशी मागणी केली. पहा ते काय म्हणाले…