महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी सोलापुरात ; राजमातेंच्या 30 मूर्तीचे वाटप ; नरेंद्र काळे यांचा उपक्रम
सोलापूर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ३० मंडळांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचे वितरण गुरुवारी (दि.२९) दुपारी १२.३० वाजता सेवासदन प्रशालेजवळील ड्रीम पॅलेस येथे होणार असल्याची माहिती भाजपाचे माजी शहर अध्यक्ष आणि संयोजक नरेंद्र काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर, पद्मश्री डॉ. खा. विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांनाही मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करता यावी याकरिता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचे वाटप करण्यात येणार असल्याचे संयोजक नरेंद्र काळे यांनी सांगितले. त्याचबरोबर ३०० व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
मूर्तीसाठी नाव नोंदणी केलेल्या शहर जिल्ह्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांनी वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात मूर्ती वाटप कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. काळे यांनी याप्रसंगी केले.
या पत्रकार परिषदेस प्रा. देवेंद्र मदने, प्रा. सिद्धेश्वर बेडगनूर, राजकुमार पाटील, संजय कणके, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष उमेश कोळेकर, राम वाकसे, सुनील खटके, विनोद मोटे, राज बंडगर, अमर दुधाळ, सुरेश सुलतानपुरे, अभिषेक भाईकट्टी, संदीप कुलकर्णी उपस्थित होते.
—————
वैचारिक प्रबोधनही करणार
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांना मूर्तींसोबत बेलभंडार हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्रही भेट देण्यात येणार आहे, असेही नरेंद्र काळे यांनी सांगितले.