प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सोलापुरात पोलिसांची खबरदारी ; काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांकडून घेतले लिहून
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वी सतर्कता म्हणून सोलापूर शहरातील पोलिसांनी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांना सलगर वस्ती पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांच्याकडून लेखी लिहून घेण्यात आले आहे.
काय घडले होते 2019 ला
सोलापूर शहरात 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले असता त्यावेळी त्यांच्या गाडीसमोर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे व त्यांच्या सहकार्यांनी ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा देत निषेध केला होता. तसेच काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत आकाशामध्ये निषेधार्थ काळे फुगे ही सोडले होते.
त्यामुळे शुक्रवारच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील पोलिसांनी सतर्कता म्हणून पोलीस हे गणेश डोंगरे यांचा बराच वेळ शोध घेतला. त्यांच्या घरासमोर पोलीस थांबले होते. अखेर त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले आणि त्यांच्याकडून शुक्रवारी कोणतेही निदर्शने, आंदोलन करणार नाही असे लेखी लिहून घेण्यात आले आहे.