सोलापूर : अक्कलकोट मतदार संघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अभिनंदनाचा ठराव समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या ठरावाची बैठकीच्या इतिवृत्तांमध्ये नोंद घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
जिल्हा नियोजन समिती मधील निमंत्रित सदस्य अण्णाराव बाराचारे यांनी या बैठकीमध्ये बोलताना एकरूप उपसा सिंचन योजना ही तब्बल 27 वर्षानंतर पूर्ण केली. त्यासाठी अपेक्षित निधी राज्य सरकारकडून आणला. या सिंचन योजनेमुळे अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुष्काळी गावांना मध्ये पाणी पोहोचले इतर योजना या 10 वर्षात पूर्ण होतात परंतु या योजनेला सत्तावीस वर्षे विलंब लागला पण आमदार कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून ही पूर्ण झाली त्यामुळे त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला.