मोठी बातमी : सोलापुरात एमआयएम उमेदवार देणार नाही ; संविधान वाचविनाऱ्या पक्षाच्या सोबत राहणार
सोलापूर : एम आय एम पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दि यांनी सोलापुरात मोठी घोषणा केली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात पक्षाचा उमेदवार देणार नाही असे सांगत सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे ते संविधान वाचवण्यासाठी जो पक्ष लढत आहे त्यांना आमचा पाठिंबा असल्याचे सांगत नकळत त्यांनी इंडिया आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे परंतु एमआयएम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते कोणत्याही प्रचारात उतरणार नाहीत असे ही शाबदी म्हणाले.
फारुक शाब्दि यांनी आपल्या विमानतळ जवळील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली समाजातील मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर आपण हा निर्णय घेतला आहे समाजाच्या पुढे एमआयएम पक्ष कधीही जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.