धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या स्मारकासाठी करणार पाठपुरावा ; आमदार राम सातपुते यांचे आश्वासन
सोलापूर : हिंदू महासभेचे माजी आमदार धर्मवीर वि. रा. पाटील यांचे सोलापुरात भव्य स्मारक व्हावे याकरिता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आगामी काळात पाठपुरावा करणार आहे, असे अभिवचन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिले. धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी आमदार राम सातपुते यांनी दत्त चौकातील पाटील यांच्या निवासस्थानी अभिवादन केले.
आमदार राम सातपुते म्हणाले, धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या प्रेरणेतून हिंदुत्वाचे काम सोलापूरात सुरू आहे. लव्ह जिहाद, गोहत्या अशा संकटांना थोपवण्यासाठी धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या विचारांची गरज आहे.
काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीगप्रमाणेच आहे. धर्मवीर वि. रा. पाटील यांनी कायमच तुष्टीकरणाच्या राजकारणाला विरोध केला. त्यांचे विचार घेऊनच हिंदुत्वाचे कार्य पुढे नेले पाहिजे असेही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी विनायक पाटील, संजय वेणेगुरकर, रवि बंडे, श्रीमती शालिनी पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, माजी नगरसेवक अमर पुदाले, रेखा बंडे, ॲड. रघुनाथ दामले, राजू परळकर, सुधीर बहिरवाडे, ॲड. अभिषेक शिरसीकर, अभिषेक रंपुरे, अक्षय कट्टी, शिवराज झुंजे, उदय रुपनर, अभिजीत जाधव, ओंकार चव्हाण, देव, जहागीरदार आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .