महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त मोकाशी मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम
आठवण अण्णांची
सोलापूरचे माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची जयंती संपूर्ण सोलापुरात मित्र परिवाराच्यावतीने साजरी करण्यात आली.
मोकाशी मित्र परिवाराच्या वतीनेमहेश कोठे यांच्या 61 व्या जयंतीनिमित्त कुमठा नाका परिसरातील सोलापूर महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्र येथे एका कार्यक्रमाचे आयोजन झाले. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या अध्यक्षतेखाली बेघर निवारा केंद्र येतील वयोवृद्ध महिला व पुरुष यांना अन्न व फूड देण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्कंडेय रुग्णालयाचे माजी संचालक प्रशांत पल्ली, सिद्धाराम ख्याडे, नागेश वडणे, प्रमोद मोकाशी, लोकेश ईरकशट्टी, महापालिकेचे समुपदेशक वसीम शेख, गुरुशांत मोकाशी, योगेश सातभाई यांच्यासह यावेळी मोकाशी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन अशोक वाघमारे यांनी तर आभार प्रशांत पल्ली यांनी मानले.