सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत 389 अर्ज पात्र ; 40 अपात्र ही आहेत नावे
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत 469 जणांनी 429 अर्ज दाखल केले होते त्या अर्जाची छाननी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली या छाननी मध्ये 40 जणांचे अर्ज अपात्र ठरवण्यात झाले आहेत. तर 389 जणांचे अर्ज पात्र झाले आहेत.
अपात्र अर्जांमध्ये बाजार समितीची थकबाकी असणे, शेतकरी दाखला नसणे, आर्थिक दुर्बल घटकाचा दाखला नसणे, जात प्रमाणपत्र सादर न करणे, बाजार समितीचा व्यापारी परवाना असणे या कारणास्तव उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहेत.
पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा 👇👇👇👇👇
बाजार समितीच्या निवडणुकीतील पात्र उमेदवारांची यादी
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपात्र उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
सहकारी संस्था सर्वसाधारण : केदारलिंग विभुते, बाळासाहेब पाटील, नागनाथ घेरडे, सतीश ईसापुरे, व्यंकटेश मेकाले,
सहकारी संस्था महिला राखीव : जैतून पिंजारी, भौराबाई पाटील, शिवलीला भरले, निलोफर हत्तुरकर, राजश्री तमशेट्टी
सहकारी संस्था इतर मागासवर्ग : सतीश ईसापुरे
ग्रामपंचायत सर्वसाधारण : केदारलिंग विभुते, सिकंदरताज पाटील, सागर सलगर, युवराज पवार, रियाना शेख, श्रीशैल माळी, विजय राठोड, शिवराज जाधव, रमजान नदाफ, विक्रांत काकडे,
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती : रामजी गायकवाड, स्वाती माने, सुनील रणखांबे, सुरेश देशमुख, मिलिंद मुळे, दिलीपकुमार गायकवाड
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक : शिवराज जाधव, बसवराज माळगे, राम सुरवसे, सुनील तांबे, मिलिंद मुळे, संजय राठोड, प्रशांत साबळे, नागेश चांगले, गंगाधर सरवडे,
व्यापारी प्रतिनिधी : मारुती बिराजदार, रईस बागवान
हमाल तोलार प्रतिनिधी : राहुल बनसोडे
असे 40 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.