दिलीप माने सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी भेटी अन् बरच काही…पालकमंत्री जयकुमार गोरे आज सोलापूर मुक्कामी
सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार 2 एप्रिल रोजी ते सोलापुरात मुक्कामी राहणार आहे. या दौऱ्यात अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी तसेच संपर्क कार्यालयांना ते भेटी देणार आहेत. यासह जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा सुद्धा प्रशासनाकडून घेणार आहेत. पहा त्यांचा संपूर्ण दौरा कसा आहे…
