महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मांडला अजितदादांनी अर्थसंकल्प

सोलापूर-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीचे सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११ वेळा या राज्याचे अर्थसंकल्पीय बजेट मांडत असताना महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्प सादर केला.
या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाला न्याय देण्याचे काम करीत असताना महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचा दृष्टिकोन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पात मांडला आहे. हा अर्थसंकल्प मांडत असताना अजित पवारांनी उत्पन्नाच्या बाजूवर खर्चाच्या बाजू लक्षात ठेवून दोघांचाही समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून राज्याला आर्थिक अडचणी मधून विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने तसेच केंद्र सरकार कडून मिळणारा हिस्सा व राज्य सरकारचा हिस्सा यांचा योग्य समन्वय ठेवून या अर्थसंकल्पामध्ये रस्ते, आरोग्यसेवा, घरकुल योजना, विमानसेवा, सौरऊर्जा, सामाजिक, क्रीडाविषयक, कृषीविषयक अशा विविध प्रकारच्या योजना, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला आहे. सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पामधून फायदाच होणार आहे. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.