खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी महादेव कोगनुरे ठरले लकी !
सोलापूर लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली. अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. एम के फाउंडेशन चे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांची आमदार प्रणिती शिंदे आमदार राम सातपुते यासह काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
शेवटी महादेव कोगनुरे यांनी महाविकास आघाडी बरोबर जाऊन लोकसभेचे उमेदवार खासदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णय घेऊन महादेव कोगनुरे हे शांत बसले नाहीत त्यांनी एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यासमवेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत दक्षिण सोलापूर मतदार संघ पिंजून काढला.
आज जेव्हा सोलापूर लोकसभेचा निकाल जाहीर होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे हे भरघोस मतांनी विजयी होताच महादेव कोगनुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. महादेव कोगनुरे यांना जेव्हा दोन्ही गठबंधनाकडून दबाव येत असताना ही महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय महादेव कोगनुरे यांनी घेतला होता. कोगनुरे यांनी घेतलेल्या याच निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत होताना पाहायला मिळत आहे.
कोगनुरे यापूर्वी ही माजी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांच्यासमवेत राहून भाजप पक्ष वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले. महादेव कोगनुरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत महादेव कोगनुरे यांचे नक्कीच वजन वाढल्याचे बोलले जात आहे. यामुळे भविष्यात महादेव कोगनुरे यांना महाविकास आघाडीकडून भविष्यातील मोठी जबाबदारी मिळणार हे देखील नक्की..