Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात महिला डॉक्टरची आत्महत्या ; उद्योजकासह मुलाला अटक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 June 2024
in crime
0
सोलापुरात महिला डॉक्टरची आत्महत्या ; उद्योजकासह मुलाला अटक
0
SHARES
3.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात महिला डॉक्टरची आत्महत्या ; उद्योजकासह मुलाला अटक

सोलापूर: डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन महिला डॉक्टरांनी आत्महत्या केली. याप्रकरणी आता उद्योजक आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी डॉ. ऋचा सूरज रूपनर यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापलं होतं. आरोपींच्या अटकेसाठी डॉक्टरांच्या संघटनांनी आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टर ऋचाचे पती आणि सासऱ्यांना अटक केली आहे.

पंढरपूरच्या सांगोल्यातील ज्येष्ठ उद्योजक भाऊसाहेब रूपनर यांच्या सून असलेल्या डॉ. ऋचा सूरज रूपनर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  ऋचा रुपनरने कौटुंबिक छळाला आणि हिंसाचाराला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. डॉक्टर ऋचा या पती डॉ. सूरज रूपनर याच्या सोबत पंढरपुरात फॅबटेक हॉस्पिटल चालवत होत्या. एमआरआय मशीन विकत घेण्यासाठी पती सूरज रूपनरने ऋचा यांना जमिनीवर कर्ज काढ किंवा माहेरच्यांकडून पैसे घेऊन ये, असा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून ऋचा रूपनर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तक्रार दाखल होत नसल्याने सोशल मीडियावर सांगोल्यातील डॉक्टरांनी मोहिम सुरु केली होती. पंढरपुरातील डॉक्टर्सनी एकत्र येत सांगोला पोलीस ठिय्या आंदोलन केले होते.

ऋचा यांचे बंधू ऋषिकेश संजय पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली होती. डॉ. ऋचा आणि डॉ. सूरज यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. मात्र डॉ. सूरज हा व्यभिचारी होता. एमआरआय मशिनसाठी त्याने ऋचाच्या मालकीची जमीन गहाण ठेवून कर्ज काढावे किंवा माहेरुन पैसे आणावेत असा तगादा लावला होता. त्यामुळे ऋचाने आत्महत्या केली, अशी माहिती ऋषिकेश पाटील यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.

६ जून रोजी ऋचाने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यानंतर तीन दिवसांनी डॉक्टर सुरज रुपनर यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आधी ऋचाचे सासरे भाऊसाहेब रुपनर यांना अटक केली. त्यानंतर सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून पोलिसांनी सूरज रुपनर यांना अटक केली.

*महिला आयोगाने घेतली दखल*

या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून या प्रकरणात आयोग पाठपुरावा करेल असे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. “सोलापूरमध्ये पती डॉ.सूरज रुपनर यांच्याकडून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराला, मानसिक त्रासाला कंटाळून डॉ.ऋचा पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना माध्यमातून समोर आल्यानंतर काल मी पोलीस निरीक्षकांशी फोनवर चर्चा केली होती. फरार आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांच्या शोध पथकांची संख्या वाढवण्याच्या सूचना काल केल्या होत्या.त्यानुसार कारवाई होत आज सकाळी आरोपी पती आणि सासरे यांना अटक करण्यात आली आहे. आता यापुढील तपास जलदगतीने करत आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक,सोलापूर यांना देण्यात आले आहेत. सुशिक्षित कुटुंबातील, रुग्णसेवेत कार्यरत असणाऱ्या आरोपी व्यक्तीचे असे वर्तन अत्यंत निंदनीय आहे. डॉ.ऋचा पाटील पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग पाठपुरावा करेल,” असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Tags: Solapur crimeSuisideआत्महत्या
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या कासेगाव मधील ओढ्याच्या पुरात तिघे गेले वाहून ; दोघे वाचले एकाचा पत्ता लागेना

Next Post

अलफीया पठाणला एमआयएमच्या फारूक शाब्दीकडून 50 हजाराची आर्थिक मदत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अलफीया पठाणला एमआयएमच्या फारूक शाब्दीकडून 50 हजाराची आर्थिक मदत

अलफीया पठाणला एमआयएमच्या फारूक शाब्दीकडून 50 हजाराची आर्थिक मदत

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001213
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group