ज्योतीताई सहा महिने तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय केले? रामभाऊ आचारसंहितेत आश्वासन ; किती वेड्यात काढणार
स्व. करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या युवकांवर 353 कलमानुसार गुन्हे दाखल झाले होते.
या संदर्भात शिवसेना प्रवक्ते ज्योती वाघमारे ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सहा महिने अगोदर मोची समाजबांधवांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन दिले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन व हमी ज्योतीताई वाघमारे यांनी समाज बांधवांना दिले होते.
आजपर्यंत सहा महिन्यापेक्षा अधिक महिने झाले असूनही मोची समाज बांधवांवरील गुन्हे माफ झाले आहे का ?
आत्ता सोलापूर लोकसभा निवडणूक तोंडावर आले असताना ज्योती वाघमारे व भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून फोन द्वारे ते गुन्हे माफ होतील असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे असे सांगता, आचारसंहितेचा काळात असा आश्वासन देता येतो का ?
आजपर्यंत मुख्यमंत्री सांगूनही मोची समाजबांधवांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाही. हे तुम्हाला माहीत नाही काय? मा. मुख्यमंत्री यांच्याकडे तुम्हीच घेऊन गेले होते ना ? त्याचे काय झाले. याचे उत्तर कोण देणार, जे काम आजपर्यंत मुख्यमंत्री सांगूनही झाले नाही आत्ता उपमुख्यमंत्री करू शकतील का?
समाज बांधवांना किती वेड्यात काढता, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे त्यांच्या कुटुंबावर ज्या अडचणी आल्या ते तुम्हाला समजणार नाही. माझ्या कुटुंबावर हा प्रसंग ओढावला आम्ही ते दुःख भोगले, ज्योतीताई वाघमारे आपल्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही भोळ्या भाबड्या मोची समाजाला अजून किती वेड्यात काढणार, मोची समाजबांधवांची दिशाभूल करू नका, समाज आता जागरूक झाला आहे, खोट्या भुलथापांना बळी पडणार नाही
मोची समाजाची कन्या व
माजी नगरसेविका वैष्णवीताई अंबादास (बाबा) करगुळे