दिलीप माने मुंबईकडे रवाना ; दुपारी हातात घेणार काँग्रेसचा झेंडा ; कोण कोण आहेत सोबत
सोलापूर : पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते, माजी आमदार दिलीप माने हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. त्यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले असून उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तसेच सोलापूर शहरातील प्रमुख 200 पदाधिकारी समर्थक त्यांच्यासोबत मुंबईला गेले आहेत.
या 200 पदाधिकाऱ्यांमध्ये विविध गावचे सरपंच, माजी सभापती, बाजार समितीचे माजी संचालक, सोसायटी चेअरमन, माजी नगरसेवक यांचा समावेश आहे.
दुपारी दोन नंतर मुंबई दादर येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात दिलीप माने यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेश होणार असून त्यावेळी दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांची आवर्जून उपस्थिती राहणार असल्याची माहिती मिळाली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढविल्यानंतर माने हे 5 वर्ष शांत राहीले. आता लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सोलापूर शहर, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडून काँग्रेस पक्ष आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.