Friday, August 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात पालकमंत्र्यांचा मान मिळाला जिल्हाधिकाऱ्यांना ; कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 August 2024
in solapur
0
सोलापुरात पालकमंत्र्यांचा मान मिळाला जिल्हाधिकाऱ्यांना ; कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण
0
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात पालकमंत्र्यांचा मान मिळाला जिल्हाधिकाऱ्यांना ; कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

 

सोलापूर, दिनांक 15(जिमाका):- भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉ ची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते. त्यामुळे सोलापूरचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

 

भारताचा 78 व स्वातंत्र्य दिन निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या हस्ते संपन्न झाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती या ठिकाणी शासकीय ध्वजारोहणासाठी गेल्याने हा मान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मिळाला.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले-तेली, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वैशपांयन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240815-WA0036.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240815-WA0035.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240815-WA0037.mp4

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे, त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. हर घर तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे. ही मोहीम संपूर्ण देशासह सोलापूर जिल्ह्यात ही अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, संस्कृती, पर्यटन या क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन ही सर्व प्रकारचे सहकार्य करत आहे. प्रशासन ही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचतील यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. या समारंभास उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य, सैनिक ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार त्यांची सदिच्छा भेट घेऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्राचा अभिमान असलेला राष्ट्रध्वज तिरंगा ची सर्व मान्यवरांनी शपथ घेतली.

*मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण-

1. जिल्हाधिकारी कार्यालय-
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन सोलापूर श्री संतोष कुमार व्यंकटराव देशमुख यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना शाखा श्रीमती जयश्री पंच उत्कृष्ट नायब तहसीलदार, आस्थापना शाखा लक्ष्मीकांत आयगोळे उत्कृष्ट अव्वल कारकून, महसूल शाखा अविनाश स्वामी उत्कृष्ट महसूल सहाय्यक, महसूल शाखा गणेश जगताप उत्कृष्ट शिपाई यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
2. पोलीस आयुक्त कार्यालय-
नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल विशेष सेवा पदक सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब बाळू सावंत व पोलीस उपनिरीक्षक नागेश आप्पासाहेब येणपे यांना तर पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील हांडे यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
3.जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाचे मुख्य लिपिक शाम सुरवसे यांना लेखाविषयक महत्त्वपूर्ण कामकाज केल्याबद्दल उत्कृष्ट मुख्य लिपिक म्हणून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Tags: Collector kumar ashirwadCP m rajkumarIndependence daySolapur collector office
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात निवासी डॉक्टरांचा कँडल मार्च ; पश्चिम बंगाल मधील घटनेचा निषेध

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वजारोहण उत्साहात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वजारोहण उत्साहात

सोलापूर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वजारोहण उत्साहात

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995556
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group