सोलापुरात मराठा नेत्यांमध्ये पुन्हा वाद पेटला ! मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वी वादाला राजकीय रंग
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी लढत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने कोणतेही पावले उचललेले नाही. त्यामुळे सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने समन्वयक माऊली पवार यांनी सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा दिला होता.
माऊली पवार यांच्या या इशाऱ्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी उत्तर देताना सुपारी घेऊन काम करणाऱ्या माऊली पवार यांनी आपल्या लायकीमध्ये राहावे असे म्हणून पुन्हा वादाला तोंड फोडले. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना अडवण्याचे असे कोणतेही आदेश दिले नाहीत असे सांगून पवार यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान या वादामध्ये काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी उडी घेतली आहे.
अमोल शिंदे आपण सुद्धा एक काळ कॉंग्रेस मधील पिल्लावाळ होता हे मात्र विसरू नका. आपण महायुतीतील चार पिलावळ घेऊन मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका.आपण जे काय आज राजकारणात, समाजकारणात आहात ते फक्त सुशिलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे कुटुंबीयामुळे आहात. आपण मराठा आंदोलकाला डिवचू नका. तुमच्यात हिम्मत असेल तर मुख्यमंत्री दोऱ्यात पोलीस प्रशासनाला सांगून मोकळे सोडवून दाखवाच तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला मराठा आंदोलक काय असतात ते कळेल.
गणेश डोंगरे
शहर अध्यक्ष- सोलापूर युवक काँग्रेस
आंदोलक- सकल मराठा समाज,सोलापूर