सोलापूरच्या सात रस्ता परिसरात अपघात ; डंपर खाली येऊन दुचाकीवरील वृद्ध ठार
सोलापूर : छत्रपती रंगभवन चौकाकडून सात रस्ता कडे येणाऱ्या रस्त्यावर नाना नानी बागेच्या जवळ एका डंपरने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
एम एच 13 DG 6856 या क्रमांकाच्या डंपर खाली येऊन दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात ठार झालेल्याकडे होंडा डियो MH 13 CW 3769 हे वाहन होते. बाळासाहेब विश्वनाथराव कुलकर्णी असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अपघात झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले अपघात स्थळे तातडीने पोलीस दाखल झाले त्यांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतले आहे. या रस्त्यावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे अपघात घडलेल्या ठिकाणाहून थोड्याशा अंतरावर चहाच्या कॅन्टीन आहेत आईस्क्रीम पार्लर आहेत वडापाव चे दुकान आहेत त्यामुळे रस्त्यावरच नागरिक वाहने पार्क करतात यामुळे तर प्रचंड ट्रॉफीक जाम होते. आणि अशा अपघाताच्या घटना घडतात.