पवार राहिले बाजूला ; आता सोलापुरात शिवसेना काँग्रेसमध्येच जुंपली …!
सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी माऊली पवार यांच्यावर सुपारी बाज असा आरोप केला. नकळत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर ही टीका केली. अमोल शिंदे यांच्या टीकेनंतर काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी अमोल शिंदे यांना फैलावर घेतले आहे.
विनोद भोसले म्हणाले,
आज एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी बोलताना आमच्या नेत्या खासदार प्राणिती शिंदे यांच्या बद्दल जे व्यक्तव्य केले याबद्दल जाहीर निषेध करतो. वास्तविक पाहता खासदार प्राणिती शिंदे यांनी लोकसभेत आपल्या पहिल्याच भाषणात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख करून त्यांचे उपोषण सरकारने तत्काळ थांबवले पाहिजे असे निक्षूण सांगितले याचाच अर्थ असा आहे की त्यांच्या सर्व मागण्या या मान्य केल्या पाहिजेत. अमोल शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या खासदार प्राणिती शिंदे यांच्या कडून लेखी लिहून आणावे हीच भूमिका मुळात हास्यस्पद आहे, सरकार महायुतीचे असताना हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवण्यासाठी पाठपुरावा करायचा सोडून अश्या प्रकारची मागणी करणे म्हणजे या गंभीर प्रश्नांविषयी राजकारण करणे असा याचा अर्थ होतो.
समाजकारण व राजकारण काम करत असताना कोणी तरी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत असतो याचा अर्थ ते पिलावळ असतात असे नव्हे. अमोल बापू आपण ही कोणाच्या तरी नेतृत्वाखाली काम करत आहात याचा अर्थ आपणही कोणाची पिलावळ आहात. ज्या पद्धतीने तुम्ही आमचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा उल्लेख केलात ते पाहता आपल्या कडून अशी अपेक्षा नाही व आम्हाला खेद होतो कारण आज जे आपण राजकारण आत आहात त्याचा श्रीगणेशा या दोन्ही नेत्यांच्या आशीर्वादाने झाला आहे. हे आपण विसरता कामा नये. आपल्याला यांच्या मुळेच वेळोवेळी विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली हे वास्तव नाकारता येत नाही. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपण अश्या प्रकारचे व्यक्तव्य आमच्या नेत्यांच्या विरोधात करत आहात..