सोलापुरातील भटके विमुक्त ‘भाजप की काँग्रेस’ सोबत ; भारत जाधव यांच्या पाठिंब्याला 9 समाजाने दिले उत्तर
सोलापूर : भटके विमुक्त समाजाच्या नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थातर्फे लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा देण्यात आल्याची माहिती भारत जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. भटके मुक्त समाजासह संपूर्ण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापुरातील रे नगर येथील कामगारांच्या रखडलेल्या गृहप्रकल्पालादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळेच उर्जितावस्था मिळून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. भटके विमुक्त समाजासाठीचा गृहप्रकल्प भाजपाच्या माध्यमातूनच होऊ शकतो असा ठाम विश्वास भटके विमुक्त समाजाला असल्याचे जाधव म्हणाले.
दरम्यान टकारी, कैकाडी, पामलोर, पारधी, मांगारूडी, छप्परबंद, रजपूत भामटा, कंजरभाट, बेस्तर या सेटलमेंट भागातील नऊ समाजाच्यावतीने सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांची भेट घेऊन त्यावेळेस कैकाडी समाजाचे अध्यक्ष नागेश गायकवाड, गवळी, सचिव विष्णू गायकवाड, गोपाळ नंदुरकर, युवक अध्यक्ष दीपक जाधव, टकरी समाजाचे सरपंच नारायण जाधव, टकारी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गायकवाड, रमेश जाधव, बालाजी जाधव, निशांत गायकवाड, युवक जाधव पारधी समाजाचे अध्यक्ष पारूबाई काळे, महेश काळे, पामलोर समाजाचे अंकुश गायकवाड, कुणाल गायकवाड, छप्पर बंद समाजाचे अध्यक्ष युसुफ विजापुरे, पप्पू गारे, बहुरूपी समाजाचे अध्यक्ष मल्लेश सूर्यवंशी, मांग गारुडी समाजाचे अध्यक्ष श्रीकांत सकट, काँग्रेस पक्षाचे डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, प्रभाकर जाधव, प्रकाश गायकवाड, संजय गायकवाड, रमेश जाधव, बुवा किरण जाधव, गोपाल काळे, मनोज काळे, राजेश काळे, बलभीम गायकवाड, विजय जाधव, विनोद जाधव, दीपक जाधव आदी मोठ्या संख्येने नऊ समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी नऊ समाजाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करण्यासाठी गोपाळ नंदुरकर, युवराज जाधव, विष्णू गायकवाड, संजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले.