सोलापुरात शेतकऱ्यांनी सिंचन भवन समोर मांडला ठिय्या ; सीना नदीतील पाणी….
उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी, तसेच मोहोळ तालुक्यातील शिरापूर, टाकळी, शिंगोली, तरटगांव आदी गावातील शेतकरयांनी सोलापूर शहरातील उजनी सिंचन भवन च्या आतील प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले आहे.
पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
सीना नदीवरील पाकणी बंधारा, तरटगांव (तिरे) बंधारा व अकोले बंधारा हे बंधारे विरवडे बुद्क येथील महादेव ओढा येथून कॅनालमधून पाणी सोडून भरून द्यावे. या मागणीसाठी हे आंदोलन असून पाटबंधारे प्रशासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.