Monday, September 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा ; तब्बल 800 नागरिक निघाले… आनंद..उत्साह

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 February 2025
in Railway
0
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा ; तब्बल 800 नागरिक निघाले… आनंद..उत्साह
0
SHARES
6.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा ; तब्बल 800 नागरिक निघाले… आनंद..उत्साह

सोलापूर दि. 11 (जिमाका):- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथ पुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे फित कापून तसेच रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला व ही रेल्वेचे श्री जगन्नाथ पुरी कडे प्रयाण झाले. या तीर्थयात्रेचा कालावधी दि. 11 ते 16 फेब्रुवारी 2025 असा असणार आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ओरिसातील श्री जगन्नाथ मंदिर पुरी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिकांना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, रेल्वे विभागाचे मॅनेजर श्री सोना, वैद्यकीय अधिकारी ऋतुजा व्हटकर आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या योजनेअंतर्गत श्री जगन्नाथ पुरी कडे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांनी तीर्थ दर्शनासाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण यात्रा कालावधी समाज कल्याणचे अधिकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय स्टाफ सोबत असून या अनुषंगाने काही तक्रार असेल तर तात्काळ संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी समाज कल्याणच्या सहाय्यक श्रीमती सोनवणे यांनी ओरिसा येथील पुरी या ठिकाणी असलेल्या श्री जगन्नाथ मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच या कालावधीत या नागरिकांसोबत असलेल्या वैद्यकीय स्टाफ व समाज कल्याणच्या स्टाफ ची ओळख संबंधितांना करून देण्यात आली. 11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9.30 वाजता या नागरिकांना घेऊन रेल्वेने पुरी कडे प्रस्थान केले.

” देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर र्धार्मयांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे पुण्य कर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. ही बाब विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सुरू करण्यात आली आहे.

पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये श्री. जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा या ठिकाणासाठी तीर्थदर्शनाकरिता पात्र 800 लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार सोलापूर ते श्री जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा या ठिकाणी दिनांक 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 रोजी या कालावधीत तीर्थ दर्शनास जाणेकरिता मान्यता मिळालेली आहे.

या नियोजित तीर्थदर्शनाच्या यात्रेदरम्यान वैद्यकीय अधिकारी ऋतुजा व्हटकर आणि पॅरामेडीकल स्टाफ (नर्स) तसेच सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील दहा अधिकारी व कर्मचारी सोबत असणार असून तीर्थ दर्शनास जाणे करिता रेल्वे आरक्षित करण्यात आली होती अशी माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250212-WA0015.mp4

नागरिकांमध्ये आनंद, उत्साह-

तीर्थ दर्शनासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह, आनंद व श्री जगन्नाथ यांच्या भेटीची ओढ दिसून येत होती. तर ही भेट, हे दर्शन राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून होत असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झालेला दिसून येत होता.

Tags: Collector kumar ashirwadSamaj KalyanUpayukt sulochana sonawane
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातून फरार सोन्याला पोलिसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या ; वैभव वाघे खून प्रकरण

Next Post

यंदा प्रथमच निघणार पारंपरिक वेशभूषेत महिलांची बाईक रॅली ; असा साजरा होणार शिवजन्मोत्सव सोहळा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000650
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group