श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सवात प्रथमच ‘मुस्लिम’ समाजातील व्यक्तीला मिळाला मान ; अध्यक्षपदाची ‘धुरा’ कोणाच्या हाती पहा..!
15 फेब्रुवारी 2024 रोजी बंजारा समाजाचे दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची 285 व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील सखल बंजारा समाजाच्या वतीने शहरातील सात रस्ता शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली.
सदरच्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली..
पहिल्यांदाच बंजारा समाजाच्या वतीने सर्वधर्म समभावाची जाण ठेवत , मुस्लिम समाजातील उद्योजक रसूल पठाण यांचे उत्कृष्ट समाज कार्यामुळे त्यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.. या निवडी मुळे बंजारा समाजाने एक समाजापुढे आदर्श ठेवला आहे
यावर्षीच्या श्री संत सेवालाल मध्यवर्ती मिरवणूक समितीचे अध्यक्ष म्हणून युवराज चव्हाण उपाध्यक्ष नवनाथ जाधव अजय चव्हाण अविनाश पवार विकास चव्हाण सतीश राठोड तर सचिव पदी शिवाजी राठोड, कार्याध्यक्ष रसूल पठाण, प्रसिद्धी प्रमुख संजय चव्हाण आणि सहप्रसिद्धी प्रमुख राजू पवार यांची एकमताने निवड करण्यात आली..
यावेळी उद्योजक व मुख्य प्रवर्तक युवराज राठोड माजी महापौर अलका राठोड, माजी न्यायाधीश नामदेव चव्हाण, माजी अध्यक्ष नाम पवार, माजी नगरसेविका शैलजा राठोड, मेनका राठोड आयडियल शाळेचे अध्यक्ष सचिन चव्हाण, डीएम ग्रुपचे अध्यक्ष युवराज चव्हाण, स्वामी समर्थ ट्रस्टची खजिनदार लाला राठोड, मार्ग फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष राठोड, गोर सेनेचे तुकाराम राठोड संजय जाधव, व आदी पदाधिकारी कार्यकर्ते बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…
नूतन अध्यक्ष युवराज चव्हाण यांनी सेवालाल महाराजांच्या 285 व्या जयंतीनिमित्त 285 झाडांचे वृक्षारोपण लावण्याचा संकल्प करून जयंती उत्सवात अनेक सामाजिक उपक्रम घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली..
निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा बंजारा समाजातील दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या..
मध्यवर्तीची मिरवणूक ही सोलापुरात आकर्षणाचे प्रत्येक वर्षी केंद्रबिंदू ठरत आहे यंदाही सात रस्ता ते नेहरूनगर भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार असू या मिरवणुकीत बंजारा समाजाचा रुढी परंपरा त्यांची नृत्य आणि सर्व धर्मसमूभावाचा आदर्श सोलापूरकरांना पहावयास मिळणार आहे…