धर्मराज काडादी दक्षिण मध्ये अपक्ष, तुतारी नाहीच ; कार्यकर्त्यांकडून माहिती
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. दक्षिण मध्ये काँग्रेसचा ए बी फॉर्म न मिळाल्याने माजी आमदार दिलीप माने यांचा हिरमोड झाला. दुसरीकडे सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी ही दुपारी अचानक निवडणूक कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले त्यामुळे अनेक जण चकित झाले.
सोलापुरात अशी अफवा पसरली की, काँग्रेसने दिलीप माने यांचा पत्ता कट करून राष्ट्रवादी काँग्रेसने तुतारीचा ए बी फॉर्म धर्मराज काडादी यांना दिला. दुपारी तीन नंतर सोलापुरात हीच चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळाली. अडीचच्या सुमारास निवडणूक कार्यालयात गेलेले धर्मराज काडादी हे रात्री साडेसात ते आठ पर्यंत आत मध्ये होते.
बाहेर त्यांच्या समर्थकांकडून माहिती मिळाली की काडादी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
एकीकडे महाविकास आघाडी मधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली असताना दुसरीकडे दिलीप माने यांचे नाव यादीमध्ये आले परंतु पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला नाही असे असताना धर्मराज काडादी यांना राष्ट्रवादी काँग्रेस एबी फॉर्म कसा देईल असे संबंधित कार्यकर्ता म्हणाला.
आता दक्षिण मध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी कडून अमर पाटील, काँग्रेसचे दिलीप माने यांनी अपक्ष तसेच आता धर्मराज काडादी यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने चार नोव्हेंबर रोजी कोण माघार घेणार आणि कोण मैदानात राहणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.