काँग्रेसचे दिलीप माने अपक्ष दक्षिणच्या रिंगणात ; दिवसभर काय घडल्या घडामोडी
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झालेल्या माजी आमदार दिलीप माने यांनी जोरदार असे शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज भरला.
दिलीप माने यांच्या निवाससथानी सकाळी नऊ पासून ते दुपारी दीड पर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते थांबून होते, हजारों समर्थक कार्यकर्ते जमा झाले होते शेवटी दीड वाजता ए बी फॉर्म न मिळाल्याने माने बाहेर पडले आणि अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल केल्यानंतर माने म्हणाले, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारी भरली तीन पर्यंत ए बी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष अर्ज भरला, काही तरी गोंधळ सुरू असल्याचे लक्षात आल्याने शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज मिळाला नाही, वाट पाहून अपक्ष लढत आहे.
आता सर्व कार्यकर्त्यांची बोलून मी आता चार तारखेला निर्णय घेणार अशी माहिती माध्यमांना दिली.
पारंपरिक काँग्रेसची जागा असताना, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मताधिक्य मिळाले, असे असताना सेनेला जागा कशी ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस पक्ष आपल्या मित्र पक्षाला भिऊन राहतो हे अवघड आहे, तुमची भूमिका आक्रमक पाहिजे असे झाले नाही त्यामुळे हे काँग्रेस संपण्याचे द्योतक वाटत आहे.
हे दिलीप माने यांचे नुकसान नाही, माझे पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये वर्चस्व आहे, सहकारी सोसायट्या माझ्या आहेत. आमच्या घराण्याला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्याचे नाही तर महाराष्ट्रचे काँग्रेस कमी पडले असा आरोप त्यांनी केला.