Saturday, June 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

नाना पटोलेंच्या रडारवर देवेंद्र फडणवीस ; फडणवीसांवर कारवाई करा ; काँग्रेस निवडणूक आयोगाकडे जाणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 May 2024
in political
0
नाना पटोलेंच्या रडारवर देवेंद्र फडणवीस ; फडणवीसांवर कारवाई करा ; काँग्रेस निवडणूक आयोगाकडे जाणार
0
SHARES
183
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाना पटोलेंच्या रडारवर देवेंद्र फडणवीस ; फडणवीसांवर कारवाई करा ; काँग्रेस निवडणूक आयोगाकडे जाणार

सोलापूर : अभिजित पाटील अध्यक्ष असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला अर्थसहायाचे आश्वासन देण्याबरोबरच राज्य शिखर बँकेकडून थकीत कर्जापोटी सुरू असलेली कारवाई थांबविण्याचे प्रलोभन दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. याप्रकरणी फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अभिजित पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सक्रिय होते. त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा प्रचारही सुरू केला होता. दरम्यान राज्य सरकारने शिखर बँकेच्या माध्यमातून थकीत कर्जापोटी पाटील यांचा कारखाना सील केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडवणीस सोलापूर दौर्‍यावर आले असता त्यांनी अभिजित पाटलांशी संपर्क साधून त्यांच्या कारखान्याला थकीत कर्जापोटी मदत करण्याचे प्रलोभन दाखवत सुरू असलेली कारवाई थांबविण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर अभिजित पाटील यांनी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच साखर कारखाना सभासदांच्या बैठकीत महायुतीला मतदान करण्याचा ठराव देखील केला आहे. निवडणूक काळात फडणवीस यांनी दबावतंत्राचा वापर करून एक प्रकारे अमिष व प्रलोभन दाखविले आहे. हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. सत्तेमध्ये असलेल्यांना निवडणूक काळामध्ये अशा प्रकारचे कोणतेही अभिवचन अथवा आश्वासन देता येत नाही. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून येते. त्यामुळे फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे पटोले यांनी सांगितले.

ही निवडणूक मोदींविरुध्द राहुल गांधी नसून ती मोदींविरुध्द जनता अशीच आहे. आता जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे पराभव समोर दिसत असल्याने भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत, अशी टीकाही पटोले यांनी केली.
या पत्रकार परिषदेस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार वझाहत मिर्झा, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड.नंदकुमार पवार, सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सुशील बंदपट्टे उपस्थित होते.

भाजपमध्ये सक्रीय गुंडांना संरक्षण

सोलापूर शहरात भाजपमध्ये सक्रिय असलेल्या गुंडांना संरक्षण दिले जात आहे. मात्र विरोधी पक्षातील गुंडांवर तडीपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. भाजपकडून सत्तेचा अशाप्रकारे दुरुपयोग केला जात असून हा दुजाभाव आम्ही सहन करणार नाही. याबाबत मी स्वत: पोलीस आयुक्तांशी बोललो असून हा प्रकार थांबविला नाही तर आपण याबाबतही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. भाजपचे हे कृत्य म्हणजे ते या निवडणुकीत घाबरलेले आहेत, हे दिसून येते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

मतदानाचे पाच टप्पे हे षडयंत्र

यापूर्वी काँग्रेस कार्यकाळात लोकसभेच्या निवडणुका या दोन टप्प्यांमध्ये घेतल्या जात होत्या. मात्र आता भाजपाने निवडणुकीचे पाच टप्पे केले आहेत. निवडणुका जिंकण्याच्यादृष्टीने हे एक षडयंत्र आहे. मात्र याचा विकासकामांवर व टंचाईवरील उपाययोजनांमध्ये परिणाम होत आहे. पाच टप्प्यात निवडणुका असल्याने आचारसंहितेचा कालावधी वाढला. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे विकासकामांनाही खीळ बसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

Tags: Devendra fadnvisLoksabha election 2024Loksabha electionsNana patole
SendShareTweetSend
Previous Post

मराठ्यांनों महायुतीला मतदान करा ; नरेंद्र पाटील यांचे सोलापुरात आवाहन ; आरक्षणाचा विषय येताच झाले आक्रमक

Next Post

राम सातपुते यांची बदनामी करणे भोवले ! काँग्रेसच्या राज सलगर यांच्यावर गुन्हा दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राम सातपुते यांची बदनामी करणे भोवले ! काँग्रेसच्या राज सलगर यांच्यावर गुन्हा दाखल

राम सातपुते यांची बदनामी करणे भोवले ! काँग्रेसच्या राज सलगर यांच्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982804
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group