मराठ्यांनों महायुतीला मतदान करा ; नरेंद्र पाटील यांचे सोलापुरात आवाहन ; आरक्षणाचा विषय येताच झाले आक्रमक
सोलापूर : महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी अमोल शिंदे, संतोष पवार, इंद्रजित पवार, दिलीप कोल्हे, नाना मस्के, अनंत जाधव, संजय सरवदे , सुहास कदम हे नेते उपस्थित होते.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडात काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद होते, त्यांनी मराठा समाजासाठी काय केले मग त्यांना मदत करणार का? पण त्या उलट देवेंद्र फडणवीस यांनी 12 टक्के आरक्षण दिले, आर्थिक विकास महामंडळ दिले, सारथी दिले, पहिल्या टप्प्यात कित्येक हजार मुले कामाला लागली, नोकऱ्या मिळाल्या, सवलती मिळवून दिल्या, ज्या मुख्यमंत्र्यांनी मी मराठा समाजाचा आहे, जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळवून देईन असे सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, आपली यंत्रणा लावून कुणबी प्रमाणपत्र शोधून काढले मग या सरकार सोबत मराठा समाजाने जाऊ नये का?
दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय येताच ते आक्रमक झाले पहा ते काय म्हणाले…