Tuesday, August 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजपच्या अक्षय अंजीखाने, नागेश सरगम, नागेश खरात यांना संधी ; या पदावर झाली निवड

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 April 2025
in political
0
भाजपच्या अक्षय अंजीखाने, नागेश सरगम, नागेश खरात यांना संधी ; या पदावर झाली निवड
0
SHARES
698
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपच्या अक्षय अंजीखाने, नागेश सरगम, नागेश खरात यांना संधी ; या पदावर झाली निवड

सोलापूर : भाजप कार्यकर्त्यांनी समर्पितपणे काम करावे. जुन्या-नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांना न्याय द्यायचे काम पक्ष निश्चितच करेल, अशी ग्वाही शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी दिली.

भारतीय जनता पक्ष शहर कार्यालयात मंडल अध्यक्ष नियुक्ती जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदेश भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. याअंतर्गत भारतीय जनता पक्ष शहर कार्यालयात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. आमदार देवेंद्र कोठे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नावे जाहीर करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शहर मध्य मतदार संघात मध्य पूर्व मंडल अध्यक्षपदी अक्षय अंजीखाने, मध्य मध्य मंडल अध्यक्षपदी नागेश सरगम तर मध्य पश्चिम मंडल अध्यक्षपदी नागेश खरात यांची पक्षाने नियुक्ती केल्याचे जाहीर केले. यावेळी या तीनही नूतन अध्यक्षांचा आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पुढे बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा केवळ भारतातच नव्हे जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. देशभरात सुरू असलेल्या भाजपच्या संघटन पर्व अंतर्गत महाराष्ट्रात दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्यात आले. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात संघटन पर्व अंतर्गत पहिल्या टप्प्यात प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात सक्रिय सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि तिसऱ्या टप्प्यात मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. ही अध्यक्ष निवड प्रक्रिया अतिशय प्रेरणादायी म्हणावी लागेल. कारण या पक्षात रचना, प्रक्रियेला महत्त्व आहे. काम करणाऱ्याला कार्यकर्त्यांना पक्ष निश्चितच संधी देते, हे या नियुक्ती प्रक्रियेने दाखवून दिले आहे. ज्यांना संधी मिळायला नाही त्यांचादेखील पक्ष नक्कीच विचार करेल. यापूर्वी शहर मध्यमधील भाजपचा कार्यकर्ता हा विकास कामांसाठी निधी आदींबाबत वंचित होता, पण आता या मतदारसंघात भाजपचा आमदार झाल्याने कार्यकर्त्यांना निश्चितपणे न्याय मिळणार आहे. कार्यकर्त्यांनी कामे सुचवावीत, त्याची पूर्तता केली जाईल तसेच पक्षाकडून कार्यकर्त्यांना संधी देखील दिली जाणार आहे, अशी मी ग्वाही देतो.

शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले की, जुने व अनुभवी कार्यकर्ते या निकषावर पक्षाकडून मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. नूतन मंडल अध्यक्षांवर जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यांना बूथ अध्यक्ष व बूथ सदस्यांसोबत संपर्क ठेवावा लागणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे गणित वेगळी होती. महापालिका निवडणुकीचे गणितही वेगळे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची गणिते गृहीत धरून कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत गाफील राहू नये. महापालिका निवडणुकीसाठीदेखील जोमाने काम करण्याची गरज आहे.

याप्रसंगी बोलताना माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू म्हणाले की, आज झालेल्या नियुक्त्या ही केवळ आकडेवारी नाही, तर जनाधार आणि जनविश्वासावर आधारित असणारी शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. आता अधिक लोकांपर्यंत पोहोचत, सर्वसामान्य मतदारांशी थेट संवाद साधत, भाजपा राज्यामध्ये अंत्योदयाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
सर्व नवनियुक्त मंडल अध्यक्षांचे मी अभिनंदन करतो. “राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हे सांगणारी भाजपा परिवाराची विचारधारा आपापल्या मंडल परिसरात नव्याने रुजवण्यासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

या कार्यक्रमास भाजपचे सरचिटणीस विशाल गायकवाड, संघटन पर्व निवडणूक अधिकारी श्रीनिवास करली, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, प्रशांत फत्तेपुरकर, प्रवीण दर्गोपाटील, कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी, शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी, जेम्स जंगम, माजी नगरसेवक अनिल पल्ली,मेघनाथ येमुल, राजकुमार हंचाटे, राजेश अनगिरे, माजी नगरसेविका रामेश्वरी बिरू, मीनाक्षी कंपली, महिला मोर्चाचे संगीता खंदारे, अंजली वलसा,शर्वरी रानडे, जैन प्रकोष्ठेचे एड . साधना संगवे, व्यंकटेश कोंडी, दत्तात्रय पोसा, आनंद बिर्रू, रामदास मगर, अंबादास करगुळे, शिक्षक आघाडीचे दत्तात्रय पाटील सर, मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा, भटक्या विमुक्त जाती मोर्चाचे लक्ष्मण गायकवाड, SC मोर्चा मोर्चा शहराध्यक्ष मारेप्पा कंपेली,, अनंत गोडलोलू, महेश बनसोडे, क्रीडा प्रकोष्टचे यशवंत पाथरूट, OBC मोर्चा उपाध्यक्ष श्रीनिवास जोगी, विजय महिंद्रकर, प्रशांत पल्ली, सिद्धेश्वर कमटम, महेश अलकुंटे, मनोज कलशेट्टी,राम गड्डम, सोशल मीडियाचे अभिषेक चिंता, अंबादास सकीनाल, किरण भंडारी,अप्पू कडगंची,शिरीष गायकवाड, इजाज सय्यद, रवी भवानी, रमेश पतंगे, नरेश पतंगे, राजशेखर येमुल, बाबुराव शिरसागर, मनोज पिस्के, सतीश तमशेट्टी,विशाल धोत्रे, विजय धोत्रे, प्रकाश गाजुल,गोविंद बत्तुल,रमेश मिट्ठा, ज्ञानेश्वर गवते,आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना भीमसैनिकांना शुभेच्छा द्यायला वेळ नाही ; आनंद चंदनशिवे यांची नाराजी

Next Post

पोलीस हवालदार आसिफ मुजावर यांचे निधन ; पोलीस दलातर्फे हवेत गोळ्या झाडून सशस्त्र मानवंदना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
पोलीस हवालदार आसिफ मुजावर यांचे निधन ; पोलीस दलातर्फे हवेत गोळ्या झाडून सशस्त्र मानवंदना

पोलीस हवालदार आसिफ मुजावर यांचे निधन ; पोलीस दलातर्फे हवेत गोळ्या झाडून सशस्त्र मानवंदना

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995680
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group